Jump to content

नारायण मल्हार जोशी

Narayan Malhar Joshi (es); Narayan Malhar Joshi (fr); Narayan Malhar Joshi (yo); Narayan Malhar Joshi (sl); Narayan Malhar Joshi (nl); Narayan Malhar Joshi (ca); नारायण मल्हार जोशी (mr); Narayan Malhar Joshi (de); Narayan Malhar Joshi (ast); Narayan Malhar Joshi (sq); Narayan Malhar Joshi (en); Narayan Malhar Joshi (ga); என். எம். சோசி (ta) sindicalista indio (es); Indiaas vakbondsbestuurder (1879-1955) (nl); Indian trade unionist (1879–1955) (en); indischer Gewerkschafter (1879–1955) (de); Indian trade unionist (1879–1955) (en); ceardchumannaí Indiach (ga); نقابي هندي (ar); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag)
नारायण मल्हार जोशी 
Indian trade unionist (1879–1955)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून ५, इ.स. १८७९
गोरेगाव
मृत्यू तारीखमे ३०, इ.स. १९५५
नागरिकत्व
व्यवसाय
पद
  • member of the Central Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नारायण मल्हार जोशी (जन्म : गोरेगांव-कुलाबा जिल्हा, ५ जून १८७९; - ३० मे १९५५) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते.[ चित्र हवे ] ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते.

जोशी यांचे वडील वेदविद्यासंपन्न आणि प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते सन १८९३मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. . न्यू इंग्‍लिश स्कूल मधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण झाले. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१-१० या काळात अहमदनगरपुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबईरत्‍नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन केले. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.


ना.म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUC (All India Trade Union Congress)ची स्थापना केली. ते मवाळ नेते होते. नारायण मल्हार जोशी यांनी इ. स.१९११ मध्ये अलाहाबाद येथे ´सामाजिक सेवा समिती `स्थापन केली. सामाजिक प्रश्नाचा अभ्यास व त्यावर चर्चा ही समिती करत असे. रात्रशाळा, ग्रंथालये, औषधालये हे उपक्रम य समितीने राबवले.

एन.एम. जोशी मार्ग

मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल (Delisle) रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधीकाळी ना.म. जोशी मार्ग झाले असले, तरी नागरिक, टॅक्सीचालक त्याला जुन्या नावानेच ओळखतात. हा चार किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वेच्या रुळांना जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ, एलफिन्स्टन रोड आणि लोअर परेल ही पाच रेल्वे स्टेशने येतात.

सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूल

ना. म. जोशी यांनी १९११ साली सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल या संस्थेची स्थापना केली होती. याच माध्यमातून शिक्षण आणि विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात या संस्थेतून केली जात होती. त्याच संस्थेत परळ विभागात पहिल्यांदा १९२२ साली सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूलची स्थापना करण्यात आली होती.

सहकारी मनोरंजन मंडळ ही परळ येथील एक नाट्यसंस्था आहे'

ना. म. जोशी यांनी २० सप्टेंबर १९२२ साली गिरणगावातील कामगार वर्गासाठी सहकारी मनोरंजन मंडळ या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. दिनांक ३० नोव्हेंबर १९२५ रोजी सहकारी मनोरंजन मंडळ सहकारी तत्त्वावर रजिस्टर करण्यात आले.

सन १९२० च्या काळात परळ-पोयबावाडी ह्या भागात माडांच्या वाड्या, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटून गेला होता. दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जिवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती ज्या दर्जाची असेल त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टीिनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून या संस्थेद्वारे कामगारांचे जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगार नेते कै. ना.म. जोशी यांच्या मनात होते.

याच काळात गिरगावांत राष्ट्रभूषण नाटक कंपनी होती. त्या संस्थेत गंगाराम कदम भूमिका करत असत. शिवाय 'हिंद सेवक नाट्य समाज' या नावाची एक संस्था होती. या संस्थेत शिवाजी पाटकर, द्वारकानाथ पाटील, दाजी मसुरकर, पाडावे, इत्यादी नट भूमिका करीत असत. या सर्वांच्या सहकार्याने संघाने, करीमभाई मिलमध्ये कच्ची रंगभूमी उभारण्यात आली होती व तेथे नाटके होऊ लागली होती.

'करीमभाई मिलच्या रंगभूमी'वर होत असलेल्या नाटकांमुळे ना.म. जोशी यांचा नटांशी संबंध येऊ लागला. त्यांना संघाचे इतर कार्यकर्ते पु. गो. नाईक, सहस्रबुद्धे, चित्रे, फासे, बडे, काणेकर, फणसे, यांचे सहकार्य मिळाले. या सर्व गोष्टींचा समन्वय घडून, जेव्हा परळमध्ये दामोदर हॉल बांधला गेला, त्यासुमारास दि. २० सप्टेंबर १९२२ रोजी त्या हाॅलमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ स्थापन झाले. दामोदर हॉलसारखी भव्य जागा विनाभाड्याने बाराही महिने वापरण्यास मिळू लागली व कामाला सुरुवात झाली. करीमभाई रंगभूमीवरील दुसरे नट दाजिबा परब हेही 'सहकारी मनोरंजन'मध्ये सामील झाले.

अप्पा टिपणीस यांच्या 'राधा माधव' या नाटकाने सुरुवात झाली. शिवाजी पाटकर यांनी तालीम मास्तर म्हणून काम पाहिले. विविध संस्थांच्या मदतीसाठी नाटकांचे प्रयोग केले. सहकारी तत्त्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे, हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारीमध्ये सामील झाल्यामुळे त्या मंडळाच्या सामानाची किंमत ठरवून ती रक्कम ह्या सभासदांच्या भागापोटी जमा करण्यात आली.

सन १९२६-२७ साली मंडळाने सर वेस्ली विल्सन हॉस्पिटल फंडास नाटकाच्या उत्पन्नातून मदत केली. त्याबद्दल मुंबईच्या गव्हर्नरांचे हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक मिळाले. इतर संस्थांकडून व जनतेकडून वाहवा मिळाली व आणखी पदके मिळाली. त्यावेळी एकूण बारा पदके सहकारी मनोरंजन मंडळाला मिळाली.

ल. ग. सुळे लिखित ‘लग्नसोहळा’ या नाटकापासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पुरस्कार मंडळाने सुरू केला. नटवर्य नानासाहेब फाटक, मा . दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, राजाराम शिंदे, बाबासाहेब नाईक, मनोहर चव्हाण, अनंत दामले, शंकर घाणेकर, श्री. जोगळेकर, किशोरी पाठक, सौ. ललिता पेंढारकर, शालिनी भालेकर, सुमन मराठे, जयश्री शेजवाडकर, कुसूम चव्हाण असे असंख्य कलाकार वसंत शेणई, बाळ पवार सारखे दिग्दर्शक, नट, पार्वती कुमार सारखे नृत्यदिग्दर्शक हे मंडळाचे सभासद मराठी रंगभूमीवर गाजले व त्यांनी मंडळाचे सभासदत्व अभिमानाने मिरविले.

१९३५ पर्यंत गंधर्वयुगाचा प्रभाव मराठी रंगभूमीवर होता . त्यानंतर चित्रपटाच्या आक्रमणाने मोठमोठे नाट्यदिग्गज उन्मळून पडले, अशा उतरत्या कालखंडात १९६० पर्यंत कामगार रंगभूमीने मराठी रंगभूमीला तगवले, जगवले व वर्धिष्णू ठेवले व त्यात सहकारी मनोरंजन मंडळाचा वाटा सिंहाचा होता. नुसती नाटकेच करून मंडळ थांबले नाही, तर अत्यल्प मोबदल्यात आपदस्तांना, दुष्काळ पीडितांना व नाट्यसंस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत केली.

या संस्थेच्या माध्यमातून मराठी नाट्यसृष्टीला अनेक नामांकित लेखक,दिग्दर्शक नट मिळाले. २० सप्टेंबर 2022 रोजी या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या सुरू असलेल्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या निम्मिताने हे मंडळ पुन्हा चर्चेच्या झोतात आले आहे.

कौटुंबिक

नारायण मल्हार जोशी हे मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते.

ना.म. जोशी यांची पत्नी रमाबाई १९२७ साली निधन पावली. त्यांच्या दोन मुलींपैकी ज्येष्ठ मुलगीही १९३४ मध्ये मरण पावली. त्यांचे दोन पुत्र सुविद्य व सुस्थितीत आहेत.


संदर्भ