Jump to content

नारायण दामोदर सावरकर

नारायण दामोदर सावरकर (२५ मे, इ.स. १८८८ भगूर जि. नाशिक - १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९ मुंबई) हे चरित्रलेखक व कादंबरीकार होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते बंधू होते.[] स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ इंग्लिश भाषेतील हिंदुत्वहिंदुपदपादशाही या ग्रंथांचे मराठी भाषांतर त्यांनी केले. कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी मुंबईत दंतवैद्याचा व्यवसाय केला. होमरुल चळवळ व अन्य काही राजकीय चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. श्रद्धानंद या सावरकरवादी साप्ताहिकाचे ते सात वर्षे संपादक होते.[] मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा यांच्या दवाखान्यात सुरू झाली होती.

हिंदू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या अध्यक्षा हिमानी अशोक सावरकर या नारायण यांच्या स्नुषा होत्या.

महात्मा गांधींची हत्या झाल्या नंतर महाराष्ट्रात दंगली उसळल्या. त्यात सावरकर दगड लागून जखमी झाले होते. कालांतराने यातच त्यांचा मृत्यू झाला.

लेखन

  • जाईचा मंडप खंड १ (इ.स. १९१३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • जाईचा मंडप खंड २ (इ.स. १९१४) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • मरण की लग्न (पूर्वार्ध इ.स. १९३३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • सेनापती तात्या टोपे (इ.स. १९४०)
  • हिंदूंचा विश्वविजयी इतिहास (इ.स. १९४४)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Veer Savarkar's Family Members" (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "सावरकर, नारायण दामोदर". मराठी विश्वकोश. २३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.