Jump to content

नारायण कृष्ण गद्रे

नारायण कृष्ण गद्रे (जन्म ७ मार्च १८७०[] - मृत्यू १४ जुलै १९३३[]) हे मराठी लेखक आणि चरित्रकार होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते[]. गद्रे ह्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.

पूर्ववृत्त

गद्रे ह्यांचा जन्म वाई येथे झाला. त्यांचे वडील कृष्णंभट गद्रे ह्यांनी वेदाध्ययन केले होते आणि ते अध्ययनअध्यापनाचे काम करून उदरनिर्वाह करत असत. गद्रे ह्यांचे पाळण्यातील नाव दिनकर असे होते. मात्र आई त्यांना नानू ह्या नावाने हाक मारत असल्याने त्यांचे प्रचलित व कागदोपत्री नाव नारायण असे झाले. मात्र काही लेखन त्यांनी दिनकर किंवा कृष्णात्मज दिनकर ह्या नावानेही केेलेले आढळते.[]

शिक्षण व नोकरी इ.

गद्रे ह्यांचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने पंतोजींच्या शाळेत झाले. तसेच त्यांच्या वडिलांकडे पुरुषसूक्त इ. आवश्यक त्या नित्य ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. इ.स. १८८१पासून त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. वाई, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जावे लागले. त्यातील काही काळ ते पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी होते व ह्या काळात टिळक आणि आगरकर हे त्यांना शिक्षक म्हणून लाभले. इ.स. १८८८ साली गद्रे यू. ए. एफ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. इ.स. १८९० ते इ.स. १९२३ ह्या काळात गद्रे ह्यांनी मुंबई येथे हवामानखात्यात नोकरीस होते.[]

कार्य

गणेशोत्सवातील मेळा

लोकमान्य टिळक ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गणेशोत्सवात विविध मेळे असत. त्याचे अनुकरण करून गद्रे ह्यांनी एक मेळा इ.स. १८९५ साली सुरू केला. तो इ.स. १९१४ पर्यंत सुरू होता. ह्या मेळ्यांत म्हणण्यासाठी विविध विषयांवरील व राष्ट्रभक्तिपर पदांचे लेखन गद्रे करत असत.[]

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी गद्रे हे एक होते. इ.स. १९२३पर्यंत ते ह्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सभासद होते. मुंबईतील वास्तव्याच्या काळात गद्रे हे आपल्याकडील पुस्तके व मासिके ह्या संस्थेला देत असत.[]

सरस्वतीमंदिर

इ.स. १९०१ मध्ये पुणे येथे षण्मासिक म्हणून निघालेल्या व पुढे कालांतराने मासिक स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या सरस्वतीमंदिर ह्या नियतकालिकाच्या प्रकाशनात गद्रे ह्यांचा सहभाग होता. ह्या नियतकालिकातूनच गद्रे ह्यांचे महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग ह्यांसारखे लेखन प्रकाशित झाले.[]

लेखन

कादंबरी

  1. प्याद्याचा फर्जी अथवा भोसले घराण्याचा अभ्युदय. बडोदे; दा. सा. यंदे, इंदुप्रकाश; मुंबई; १८९९; ४ + १८५; ग्रंथसंपादक व ग्रंथप्रकाशक मंडळीची पुस्तकमाला; नं. १४, रु. १पुनर्मुद्रण १९५८, अ. वि. गृह प्रकाशन, पुणे २, मूल्य रु. २=२५
  2. हिंदुवा सूरज अथवा बाप्पा रावळ चक्रवर्ती; मुंबई; १९००; ४ + १८०; रु. १॥
  3. मनूच फिरला (कृष्णतनय); मोदवृत्त; वाई; १९०६; ४+३८३; रु. २

कविता

  1. श्रीमत् प्रतापसिंह काव्य; पहिला खंड; शारदाक्रीडन; मुंबई; १९०१; ४ + ४८;·॥·

नाटक

  1. अक्षविपाक अथवा संगीत द्यूतविनोद नाटक; नेटिव्ह ओपिनियन; मुंबई; १९०९; ७८; ·॥·

चरित्रे

  1. कै. प्रो. श्री. ग. जिन्सीवाले यांचें चरित्र; तत्त्वविवेचक मुंबई; शके १८२५ (इ. स. १९०३), ४ + ३६;= ·॥·
  2. कै. पं. विष्णूपंत छत्रे यांचें चरित्र; नेटिव्ह ओपिनियन, मुंबई; शके १८२८ (इ. स. १९०६); ८+१३६; सचित्र; रु. १

संपादन

  1. कवीश्वर भास्करकृत शिशुपालवधकथा टिप्पणी; ठाणें मराठी ग्रंथसंग्रहालय; १९२७;+६१; ·॥·

इतिहास

  1. महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग; मुंबई, तत्त्वविवेचक, १९०५, ४+२८२, रु १॥(‘श्रीसरस्वतीमंदिरां’तील प्रकरण) सुधारित पुनर्मुद्रण : ‘महाराष्ट्रप्रभाता’च्या उपलब्ध भागासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई, १९७१ Archived 2016-04-11 at the Wayback Machine.

संदर्भ

  1. ^ a b गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. ५)
  2. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. ३६)
  3. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. १६)
  4. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. ६ ते ८)
  5. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. १३ ते १६)
  6. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. १६ ते १७)
  7. ^ गद्रे, रा. ना.; ती. कै. नारायण कृष्ण गद्रे : व्यक्ती व वाङ्मय; समाविष्ट : खरे, ग. ह. (संपा.); महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग Archived 2016-04-11 at the Wayback Machine.; संस्कारित आवृत्ती १९७१; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ; मुंबई (प्रारंभिक पृ. ५ ते ३९) (पृ. १८ ते १९)