Jump to content

नारायणहिती राजवाडा

नारायणहिती राजवाडा तथा नारायणहिती दरबार हा नेपाळची राजधानी काठमांडूमधील राजवाडा आहे. ह्या राजवाड्यात नेपाळच्या राजाचे वसतीस्थान व कार्यालय होते. देशातील महत्त्वाचे राजकीय निर्णय येथे होत असत.

हा राजवाडा एकोणिसाव्या शतकात बांधला गेला. सध्याच्या इमारती १९६१मध्ये बांधल्या गेल्या.