नामिबिया महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स आणि जर्मनी दौरा, २०२२
नामिबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२२ मध्ये युरोपचा दौरा केला. दौऱ्यात नामिबियाने नेदरलँड्सविरुद्ध आणि जर्मनीविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका खेळल्या.
नेदरलँड्स महिला वि. नामिबिया महिला
नामिबिया महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२ | |||||
नेदरलँड्स महिला | नामिबिया महिला | ||||
तारीख | २७ जून – १ जुलै २०२२ | ||||
संघनायक | हेदर सीगर्स (१ली-५वी म.ट्वेंटी२०) बाबेट डी लीडे (६वी म.ट्वेंटी२०) | इरीन व्हान झील | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नेदरलँड्स महिला संघाने ६-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टार कालिस (११४) | यसमीन खान (१०८) | |||
सर्वाधिक बळी | आयरिस झ्विलिंग (१०) | सुने विट्मन (८) |
युरोपच्या दौऱ्यावर पहिल्यांदा नामिबियाने जून-जुलै २०२२ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. मालिकेतील पहिले तीन सामने स्कीडाम येथील स्पोर्टपार्क हरगा या मैदानावर खेळविण्यात आले. तर शेवटचे दोन सामने वूरबर्ग मधील स्पोर्टपार्क वेस्टव्लीट या मैदानावर झाले.
पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दुसरा सामना नामिबियाने ३ गडी राखून जिंकत मालिकेत आघाडी घेतली. तिसरा सामना नेदरलँड्सने जिंकून मालिकेत पुनरागमन केले. पहिला सामना रद्द झाल्याने मालिकेत आणखी एक सामना ३० जून रोजी खेळवण्यात आला. त्यामुळे महिला ट्वेंटी२० मालिका ही सहा सामन्यांची झाली. नामिबिया आणि नेदरलँड्सने अनुक्रमे चौथा आणि पाचवा सामना जिंकून मालिका थरारकपणे २-२ अश्या स्थितीत आणून ठेवली. सहाव्या आणि अटीतटीच्या झालेल्या निर्णायक सामन्यात यजमान नेदरलँड्सने २ धावांनी विजय मिळवत सहा सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वि | ||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
- नामिबियाने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
२रा सामना
नेदरलँड्स ८० (१५ षटके) | वि | नामिबिया ८१/७ (१९.५ षटके) |
स्टार कालिस ३५ (२८) सुने विट्मन ४/२० (४ षटके) | जुरीन डियरगार्ड्ट २३ (३८) आयरिस झ्विलिंग ३/२० (४ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- नामिबियाने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नामिबियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच नेदरलँड्सवर विजय मिळवला.
३रा सामना
नेदरलँड्स ९९/७ (२० षटके) | वि | नामिबिया २९ (११ षटके) |
हेदर सीगर्स ४१ (४०) सुने विट्मन ३/१९ (४ षटके) | अद्री व्हान देर मर्व्ह १४ (१९) कॅरोलिन डि लँग ४/६ (३ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.
४था सामना
नेदरलँड्स ८३/९ (२० षटके) | वि | नामिबिया ८४/७ (१९.३ षटके) |
हेदर सीगर्स ३९ (४२) विल्का म्वातिले ४/१८ (४ षटके) | केलीन ग्रीन २५ (२४) इवा लिंच २/८ (३ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- २७ जून २०२२ रोजीचा सामना ३० जून २०२२ रोजी खेळविण्यात आला.
५वा सामना
नामिबिया १३०/८ (२० षटके) | वि | नेदरलँड्स ७१/२ (११ षटके) |
यसमीन खान ६९ (४४) आयरिस झ्विलिंग ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
६वा सामना
नेदरलँड्स ९७/७ (२० षटके) | वि | नामिबिया ९५/७ (२० षटके) |
स्टार कालिस ३९ (४६) डेटलॅंड फोर्स्टर २/१४ (२ षटके) | मर्सझर्ली गोरासेस २५ (२८) फ्रेडरिक ओव्हरडिक ३/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
जर्मनी महिला वि. नामिबिया महिला
नामिबिया महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२२ | |||||
जर्मनी महिला | नामिबिया महिला | ||||
तारीख | २ – ३ जुलै २०२२ | ||||
संघनायक | अनुराधा दोड्डबल्लापूर | इरीन व्हान झील | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नामिबिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रिस्टिना गॉफ (५७) | सुने विट्मन (१८८) | |||
सर्वाधिक बळी | मिलेना बिरीसफोर्ड (४) | यसमीन खान (५) |
नेदरलँड्सच्या दौऱ्यानंतर युरोपच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नामिबियाने जुलै २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जर्मनीचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. मालिकेतील सर्व सामने क्रेफेल्ड येथील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले.
नेदरलँड्समध्ये ३-२ ने पराभूत होऊनसुद्धा नामिबियाने जर्मनीविरुद्ध अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन केले. पहिला सामना १० गडी राखून जिंकत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय नोंदवत तीन सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका नामिबियाने ३-० ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
जर्मनी ६१/८ (२० षटके) | वि | नामिबिया ६४/० (५.१ षटके) |
जॅनेट रोनाल्ड्स १४ (२४) व्हिक्टोरिया हामुन्येला ३/११ (४ षटके) | सुने विट्मन ४१* (१६) |
- नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- जर्मनी आणि नामिबिया या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नामिबियाने जर्मनीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
नामिबिया २२१/३ (२० षटके) | वि | जर्मनी ७१/७ (२० षटके) |
सुने विट्मन ८० (३३) श्राव्या कोलचरम १/३१ (३ षटके) | क्रिस्टिना गॉफ १५ (१८) इरीन व्हान झील २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
नामिबिया १८६/७ (२० षटके) | वि | जर्मनी १०४/८ (२० षटके) |
सुने विट्मन ६७ (३८) मिलेना बिरीसफोर्ड ४/२२ (४ षटके) | जॅनेट रोनाल्ड्स ३७ (४६) यसमीन खान ४/२० (४ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.
- सबीना नूर (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.