Jump to content

नामिबिया

नामिबिया
Republiek van Namibië
Republik Namibia
नामिबियाचे प्रजासत्ताक
नामिबियाचा ध्वजनामिबियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity, Liberty, Justice"
राष्ट्रगीत: "Namibia, Land of the Brave"
नामिबियाचे स्थान
नामिबियाचे स्थान
नामिबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
विंडहोक
अधिकृत भाषाइंग्लिश
इतर प्रमुख भाषा जर्मन
आफ्रिकान्स
क्वांगाली
लोझी
त्स्वाना
खोईखोई
हेरेरो
ओवांबो
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखहिफिकेपुन्ये पोहांबा
 - पंतप्रधानहागे गाइनगॉब
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ मार्च १९९० (दक्षिण आफ्रिकेपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ८,२५,६१५ किमी (३४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २१,१३,०७७ (१४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२.५४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.८०० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न५,९६१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६०८ (मध्यम) (१२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलननामिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०१:००
आय.एस.ओ. ३१६६-१NA
आंतरजाल प्रत्यय.na
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला ॲंगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १८८४ साली ओटो फॉन बिस्मार्कच्या नेतृत्वाखालील जर्मन साम्राज्याने येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर इ.स. १९२० साली लीग ऑफ नेशन्सने नामिबियाचा ताबा दक्षिण आफ्रिकेकडे दिला. इ.स. १९६६ साली येथे स्वातंत्र्यचळवळ चालू झाली. पुढील २३ वर्षे स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिल्यानंतर अखेरीस १९९० साली दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले.

नामिबिया नामिब व कालाहारी ह्या वाळवंटांदरम्यान वसला असून येथील बव्हंशी भूभाग रूक्ष ते अतिरूक्ष प्रकारात मोडतो. ह्या कारणास्तव नामिबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे प्रति चौरस किमी केवळ २.५ लोक राहतात. सध्या येथे लोकशाही सरकार असून नामिबियाला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. नामिबिया संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ, राष्ट्रकुल परिषद इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.

खेळ

बाह्य दुवे