Jump to content

नामदेवशास्त्री सानप

नामदेवशास्त्री सानप हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार असुन त्यांचें सुरुवातीचे शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत झाले.त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या न्यायशास्त्राच शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज द्वादशदर्शनाचार्य आंनदवन आश्रम कांदिवली मुंबई गुरुकुल पद्धतीने ९ वर्षे शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापिठाची 'न्यायाचार्य' ही पदवी संपादन केली तसेच पुणे विद्यापीठातुन एम ए(मराठी) करून 'वारकरी संतांची कुटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातुन पि एच् डी संपादन केली. भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली असून ज्ञानेश्वरी व संस्कृत चे अध्ययन-अध्यापन चालू आहे पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत "त्यांची किर्तन व प्रवचन" ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुनयात मानसिक समस्येचे समाधान आहे. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचा मोठा विकास केला आहे. आळंदी, पंढरपूर, पैठण व औरंगाबाद या ठिकाणी भगवान गडाचे मोठे मठ त्यांनी ऊभारले आहेत. तसेच भगवान गड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असुन वारकरी शिक्षण देणारे ज्ञानेश्वरी विद्यापीठ २००४ साली स्थापण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे.

गुरूवंश परंपरा

आदिनाथ→मच्छिंद्रनाथ→गोरक्षनाथ→गहिनीनाथ→निवृत्तीनाथ→ज्ञानेश्वर→ नारायण → ब्रह्मदेव → अत्री ऋषी → दत्तात्रेय → जनार्दनस्वामी → संत एकनाथ → गावोबा किंवा नित्यानंद → अनंत → दयानंद स्वामी पैठणकर → आनंदॠषी → नगदनारायण महाराज → महादेव महाराज (पहिले) → शेटीबाबा (दादासाहेब महाराज) → गोविंद महाराज → नरसू महाराज → महादेव महाराज (दुसरे) → माणिकबाबा →भगवानबाबा → भीमसिंह महाराज → नामदेव महाराज शास्त्री सानप []

नामदेव महाराज शास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी ६० फूट उंच महाद्वार, सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते. [] श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.[] नामदेव महाराज शास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेतल्यावर बरीच विकासकामे केली आहेत. स्वयंपाकगृह, महाप्रसादगृह, पारायण हॉल, कीर्तन हॉल, संत विद्यापीठ, कीर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग वगैरे. अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.[][]

श्री क्षेत्र भगवानगडावर २५ कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या भगवानगडाचा राज्यभर विस्तार करण्याचा संकल्प संस्थानने केला होता. त्यानुसार सुरुवातीला आळंदी, पंढरपूर येथे गडाच्या शाखा सुरू करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद येथे ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्र सोमवारपासून सुरू होत आहे. तिसऱ्या टप्प्यात पैठण येथे शाखा स्थापन होत असून, तेथील काम प्रगतिपथावर आहेत.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "शिष्य परंपरा". 2013-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "श्रीक्षेत्र भगवानगड". ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "भगवानगड, चांदबिबी महालावर एनर्जी पार्क करण्यासाठी प्रयत्नशील - अन्बलगन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ "भगवानगडाला "अ' दर्जासाठी आवाज उठवा". १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "आदर्श गाव योजनेत होणार भगवानगडाचा समावेश". 2011-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.
  6. ^ "भगवानगड ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्राचे उद्या उद्‌घाटन". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित.