Jump to content

नाना वाडा

नाना वाडा बाहेरील दृश्य

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या इ.स.१७८० साली स्वतःकरता बांधलेल्या शनिवार वाड्याच्या मागील बाजूस बांधलेल्या वाड्यास नाना वाडा असे म्हणतात. पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन बांधकामांचा संगम या वास्तूमध्ये आहे.

इतिहास

न्यू इंग्लिश स्कूल

१७८०मध्ये नाना फडणवीस यांनी शनीवार वाड्याजवळ बांधलेल्या नाना वाड्याचा दरवाजा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग एप्रिल इ.स. १८८२ ते डिसेंबर इ.स. १९५३ या काळात नानावाड्यात भरत. १९०७ मध्ये ब्रिटिशकाळात या वाड्याच्या मागील भागात न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची इमारत बांधण्यात आली.[]

संदर्भ