नाना फडणवीस वाडा
नाना फडणवीस वाडा हा पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे.[१] महाराष्ट्र राज्यातील वाई जवळील मेणवली येथे हा वाडा आहे.[२]
ऐतिहासिक वारसा वास्तू
भगवानराव प्रतिनिधी यांच्याकडून इनाम मिळालेल्या जागेत नाना फडणवीस यांनी इसवी सन १७६८ मध्ये हा वाडा बांधला. वाडा दुमजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे. वाड्यातील खोल्या, नानांचा पलंग आणि शयनकक्ष, खलबतखाना, पंगतीचा चौक, महिलांसाठी खास हळदी - कुंकू कार्यक्रम करण्यासाठी चौक, कचेरी, विहिरी, कारंजे अशी या वाड्याची रचना[३] असून हा वाडा चांगल्या अवस्थेत सांभाळला गेलेला आहे.[४]
या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांच्या भिंती चित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. पेशवेकालीन चित्रांचे वैशिष्ट्ये या भित्तीचित्रात दिसून येतात.[५]
चित्रदालन
- पेशवेकालीन पुष्करिणी
- पंगतीचा चौक
- नाना फडणवीस वाडा येथील चौक
- मेणवली वाड्यातील भित्तीचित्र
- मेणवली येथील घाट
- नाना फडणवीस यांचा पलंग आणि कापडी पंखा
संदर्भ
- ^ "मराठा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना". महाराष्ट्र टाइम्स. 2024-03-26 रोजी पाहिले.
- ^ "पुणे परिसर दर्शन: मेणवली येथील नाना फडणवीस वाडा". सकाळ. 2023-04-23. 2024-03-26 रोजी पाहिले.
- ^ Context: Built, Living, and Natural (इंग्रजी भाषेत). DRONAH. 2005.
- ^ "नाना फडणवीसांचा मेणवलीचा वाडा पुन्हा कसा उभा राहिला?". BBC News मराठी. 2023-03-01. 2024-03-26 रोजी पाहिले.
- ^ Apte, Bhalchandra Krishna (1988). Maratha Wall Paintings: Wai, Menavali, Satara, Pune (इंग्रजी भाषेत). Maharashtra State Board for Literature & Culture.