नातिकाजी
नातिकाजी | |
---|---|
जन्म | अमृत लाल श्रेष्ठ २५ डिसेंबर १९२५ काठमांडू, नेपाळ |
मृत्यू | २ नोव्हेंबर, २००३ (वय ७७) काठमांडू, नेपाळ |
राष्ट्रीयत्व | नेपाळी |
नागरिकत्व | नेपाळी |
जोडीदार | सरस्वती राजभंडारी |
वडील | मोहन लाल श्रेष्ठ |
आई | चंपादेवी श्रेष्ठ |
अमृत लाल श्रेष्ठ उर्फ नातिकाजी (२५ डिसेंबर १९२५ - २ नोव्हेंबर २००३)[१] एक नेपाळी गायक व गीतकार होते. माधवप्रसाद घिमिरे यांनी लिहिलेल्या "नेपाली हामी" सारख्या सदाहरित गाण्यांना संगीतबद्ध करणारे काजी हे त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक होते.[२][३][४][५][६][७][८]
आयुष्य
आजोबांनी अमृत लाल श्रेष्ठ यांना दिलेलं टोपणनाव नातिकाजी होते आणि हे नाव देशभर ओळखले जाते. त्याचा जन्म ललितपूरमधील पुलचोक येथे १९२५ मध्ये झाला होता. पाच वर्षांचा असतानाच त्याची आई मरण पावली आणि दहा वर्षांचा असताना वडील मेले. म्हणून आजोबांनी त्याला गुजयेश्वरी येथे वाढविले, जिथे आजोबा मंदिराचे पुजारी होते. नटिकाजी यांचे २ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.[९][१०]
कारकीर्द
नातिकाजी सात वर्षांचा होता तेव्हा त्याने गुजेश्वरी भजन मंडळात संवादिनी वाजवायला सुरुवात केला. १९५० मध्ये जेव्हा त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची व्यावसायिक संगीत कारकीर्द सुरू झाली. रेडिओ नेपाळमध्ये आपल्या ४० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी २००० वेगवेगळी गाणी केली. पिंजडाको सुगा, कुंजनी, पृथ्वी नारायण शाहका चार पक्ष यांच्यासह १५हून अधिक ओपेराचे श्रेय त्यांच्याकडे जाते.[१०][११][१२][१३]
सन्मान
त्यांच्या पुरस्कारांमध्ये गोरखा दक्षिण बाहु प्रथम, इंद्र राज्य लक्ष्मी प्रज्ञा पुरस्कार, छिन्नलता गीत पुरस्कार आणि भूपाल संगीत पुरस्कार आदींचा समावेश आहे.
चित्रपट संगीत
वर्ष | चित्रपट | भूमिका |
---|---|---|
१९७४ | मनको बांध | संगीत दिग्दर्शक[१४] |
१९८० | सिंदूर | संगीत दिग्दर्शक |
१९८९ | पच्चीस वसंत | संगीत दिग्दर्शक/पार्श्वभूमी संगीतकार |
१९८९ | शांतिदीप | संगीत दिग्दर्शक |
संदर्भ व नोंदी
- ^ हुसेन, मोशराफ. "New Issue :: View FDC Details :: Nepal :: Musician Natikaji Shrestha (1925–2003)". मीडियाबीडी. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Nati Kaji – Nepali Hami Lyrics | Musixmatch". म्युजिकमॅच. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Fursad.com .:: Nati Kaji ::". १० फेब्रुवारी २००९. रोजी मूळ पानापासून संग्रहित१० फेब्रुवारी २००९. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Read online latest news and articles from Nepal". 2014-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-13 रोजी पाहिले.
- ^ "Biography of Natikaji Shrestha:". ९ जून २०१३. रोजी मूळ पानापासून संग्रहित९ जून २०१३. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Nati Kaji on Apple Music". आयट्यून्स स्टोर. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Singer Ruby Joshi no more". द हिमालयन टाइम्स. २७ नोव्हेंबर २०१६. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Best of Nati Kaji (Classical) by Nati Kaji on Apple Music". आयट्यून्स स्टोर. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Thousands of Nepali Songs". नेपाली सॉंग डॉट नेट. 2019-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "Legendary musician Natikaji". बॉस नेपाळ. 2020-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Nati Kaji". इंटरनेट मुव्ही डेटाबेस. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ "'Natikaji Award – The Himalayan Times". द हिमालयन टाइम्स. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ^ नातिकाजी, Natikazi Ka Geetharu 1, २९ जुलै २०१७ रोजी पाहिले
- ^ "Natikaji Shrestha – Filmography, Full Movies, Recent Movies, Upcoming Movies List". रीलनेपाळ. 2017-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जुलै २०१७ रोजी पाहिले.