नाताळ शुभेच्छापत्र
नाताळ शुभेच्छापत्र याद्वारे नाताळ सणाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात. नाताळ या सणाविषयीच्या भावना यामध्ये व्यक्त केलेल्या असतात. नाताळ सणाच्या आधी सुमारे आठवडाभर एकमेकांना अशी शुभेच्छापत्र पाठवायला सुरुवात केली जाते. नाताळ सणाच्या पाठोपाठ येणाऱ्या नवीन ग्रेगोरियन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा यामध्ये दिल्या जातात. यामध्ये शुभेच्छा कविता, गीते, बायबल या ग्रंथातील वचने यांनी सजविलेली असतात. सुट्टीच्या आनंद व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा सुद्धा यात समाविष्ट केलेल्या असतात.[१]
स्वरूप
नाताळची शुभेच्छापत्रे सामान्यतः व्यावसायिक स्वरूपात तयार होतात आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. घरगुती स्वरूपात लहान मुले अथवा मोठी माणसे नातेवाईक, मित्रपरिवार यांनी देण्यासाठी अशी शुभेच्छापत्रे तयार करताना दिसतात. या शुभेच्छापत्रांच्या दर्शनी भागावर येशू ख्रिस्त, नाताळ वृक्ष, नाताळ बाबा, केक, मेणबत्या, स्नोमेन, रेनडियरची गाडी, बर्फाचे कण अशा प्रकारची चिन्हे किंवा बायबल ग्रंथातील वचने लिहिलेली असतात.[२]
इतिहास
सर्वात पहिले ज्ञात असे शुभेच्छापत्र मिशेल मायर याने तयार केले असे मानले जाते. त्यानंतर केलेट हॉर्सले आणि सर हेनरी कोल यांनी १ मे १८४३ साली तयार केले असे मानले जाते.
प्रकार
- ब्रिटिश राजघराण्याची शुभेच्छापत्रे-
राणी व्हिक्टोरिया हिच्या कारकिर्दीत १९४० साली नाताळच्या शुभेच्छापत्र संकल्पनेला सुरुवात झाली असे मानले जाते. केल्विन कुलीग या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात नाताळ सणाच्या शुभेच्छा व्हाईट हाऊस मधील सदस्यांना पाठविण्यात आल्या. यामध्ये असलेला, मजकूर हा आधुनिक काळातील शुभेच्छापत्राशी साधर्म्य दाखविणारा होता.
- व्यावसायिक-
व्यावसायिक स्तरावर पाश्चात्य आणि पौर्वात्य देशातील स्थानिक दुकानदार तसेच मोठ्या व्यावसायिक लोकांपर्यत व्यावसायिक आपापल्या ग्राहकांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवितात. भारत देशातही ही पद्धती प्रचलित झाल्याचे पहायला मिळते. अनेक व्यावसायिक संस्था अशा शुभेच्छापत्रांची निर्मिती करून ती ग्राहका उपलब्ध करून देतात. यावरही नाताळ सण आणि त्यासंबंधी चित्रे आणि संदेश नोंदविलेले असतात.
- सामाजिक संस्था-
काही सामाजिक संस्था त्यांच्या कामासाठी देणगी प्रोत्साहित करणारी नाताळ शुभेच्छापत्रे तयार करतात. या संस्थांना देणगी दिलेल्या दानशूर व्यक्तींना अशी पत्रे पाठविली जातात. इ. स. १९४९ साली या उपक्रमाची सुरुवात झालेली दिसून येते.[३]
टपाल तिकीटे
नाताळ सणाच्या निमित्ताने विविध देशांची पोस्ट सेवा टपालाची तिकिटे प्रकाशित करतात. वर्षभर ही तिकिटे वापरली जातात तसेच नाताळ काळात या तिकिटांवर विशेष सवलत दिली जाते.[४]
चित्रदालान
- धुरांड्यातून उतरणारा सांताचे चित्र असलेली शुभेच्छापत्र
- व्हाईट हाऊस येथील शुभेच्छापत्र
- शुभेच्छापत्र
संदर्भ
- ^ Christmas; Oldham, Gabriella (1989-07-01). Old-Fashioned Christmas Cards (इंग्रजी भाषेत). Courier Corporation. ISBN 978-0-486-26057-0.
- ^ Bauer, Ethan (2021-11-29). "The power of paper Christmas cards in a fast-paced world". Deseret News (इंग्रजी भाषेत). 2021-12-02 रोजी पाहिले.
- ^ "Christmas Cards for Schools | Fundraising Project for Schools & PTAs". School Fundraising (इंग्रजी भाषेत). 2021-12-03 रोजी पाहिले.
- ^ "Christmas stamps – World Stamp News". findyourstampsvalue.com. 2021-12-03 रोजी पाहिले.