नाताळ वृक्ष
नाताळ वृक्ष (ख्रिसमस ट्री) हे ख्रिस्ती धर्मातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य मानले जाते. नाताळ सणाला हा वृक्ष सजवून आकर्षक केला जातो. फर, पाईन, किंवा सदाहरित वृक्ष कोनिफर हे नाताळ वृक्ष म्हणून सजविले जातात.[१]
इतिहास
या वृक्षाचे महत्त्व आणि नाताळ सणाशी असलेला संबंध मध्ययुगात लिवोनिया येथे जोडला गेला. ही प्रथा उत्तर युरोपात सर्वात आधी सुरू झालेली दिसते.[२] प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी असलेले जर्मन नागरिक असा वृक्ष नाताळ सणाला घरी आणून त्याचे सुशोभन करीत असत.[३] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाल्टिक प्रदेशातील उच्चभ्रू भागात याला विशेष लोकप्रियता मिळालेली दिसते.
सजावट
पारंपरिक पद्धतीने हा वृक्ष सजविताना गुलाबाची कागदी फुले, सफरचंद,आणि मिठाई यांचा वापर केला जायचा. नंतरच्या काळात १८ व्या शतकात त्यावर मेणबत्ती,चमकते दिवे माळा, चॉकोलेटचे पुडे अशा वस्तू या वृक्षावर टांगण्यात येऊ लागल्या. जिंजर ब्रेड,चॉकोलेट आणि गोड पदार्थ हे रंगीत रिबीन वापरून या वृक्षाच्या फांद्यांना टांगण्याची पद्धत सुरू झालेली दिसते.[४] नाविन्यपूर्ण कल्पना वापरून आपल्या घरातील नाताळ वृक्ष आणि त्याची सजावट आकर्षक करण्याकडे कुटुंबात भर दिला जातो आणि सणाचा आनंद वाढविला जातो.[५]
चित्रदालन
- ऑस्ट्रेलिया येथील नाताळ वृक्ष
- चिले येथील नाताळ वृक्ष
संदर्भ
- ^ : The Editors of Encyclopaedia Britannica. "Christmas tree". www.britannica.com. 24.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "The Christmas tree: From pagan origins and Christian symbolism to secular status". 19.12.2016. 18.12.2019 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Farmer, Jacqueline (2010-07-01). O Christmas Tree: Its History and Holiday Traditions (इंग्रजी भाषेत). Charlesbridge. ISBN 978-1-60734-235-9.
- ^ Bell, Carolyn (2012). Creative Christmas Tree Decorations: Over 30 Inspiring Projects for Decorating Your Christmas Tree With Innovative Eye-Catching Ornaments (इंग्रजी भाषेत). Anness Publishing. ISBN 978-0-7548-2509-8.
- ^ HANRAHAN, LAURA (17.12.2019). "22 Cute Christmas Tree Ideas to Make Your Home Look Extra Lit This Year". www.cosmopolitan.com. 19.12.2019 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)