Jump to content

नाताळ बाजार

रात्री सजविलेला नाताळ बाजार

ख्रिसमस मार्केट (नाताळ बाजार) म्हणजे नाताळ या सणाच्या पूर्वतयारीसाठी चार आठवडे आधी सुरू झालेला खरेदीचा बाजार होय. नाताळ सणाचा उत्साह द्विगुणित करणे असाही या बाजाराचा मुख्य हेतू असतो.[] या संकल्पनेची सुरुवात जर्मनी येथे झाली असली तरी आता जगातील अनेक देशांमध्ये असे बाजार भरविले जातात.[] संत निकोलस यांचाही या बाजाराशी पूर्वापार संबंध आहे असे मानले जाते आणि या बाजारपेठात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[]

इतिहास

या बाजारपेठेचा इतिहास लक्षात घेता तो मध्ययुगातील आहे. युरोपातील जर्मन भाषिक गटाच्या निवास प्रांतात आणि रोमन धर्मोपदेशक साम्राज्य असलेल्या फ्रान्सच्या काही प्रांतात या बाजाराची सुरुवात झाल्याचे दिसून येते. इ.स. १४३४ मध्ये ड्रेसदेन येथे पहिल्या बाजाराची सुरुवात झाली असे मानले जाते. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात थाटली जाणारी दुकाने यांची पद्धत व्हिएन्ना (१२९८ साली), बुझेन (१३८४ साली)आणि फ्रॅंकफर्ट (१३९३ साली) याकाळात सुरू झाली.[] ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड येथील नाताळ बाजारही प्रसिद्ध आहेत.[]

आकर्षण

स्टार्सबर्ग येथील नाताळ बाजार

नाताळ सण साजरा करण्यासाठी आवश्यक अशा विविध वस्तू या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात हे या बाजाराचे खास आकर्षण असते.[] रत्याच्या कडेला किंवा मध्यभागी ख्रिस्ती प्रार्थनास्थळ असलेल्या परिसरात थाटलेली ही तात्पुरती दुकाने असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोषणाई केलेली असते. बाजारात येणारी नवीन उत्पादने या बाजारात दरवर्षी उपलब्ध होत असतात. यामुळे हे बाजार ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या गर्दीने गजबजलेले दिसते. नाताळ सणाशी संबंधित विविध गाणी या ठिकाणी वाद्यांच्या साथीने गायली जातात.[]

विक्रीच्या वस्तू

नाताळ सणासाठी आवर्जून खाल्ले जाणारे केक या बाजारात वैविध्यपूर्ण प्रकारात उपलब्ध असतात.[] वाईन, जिंजरब्रेड, भाजलेले बदाम, सुकामेवा,चॉकलेटचे प्रकार, विविध प्रकारच्या भेटवस्तू, सजावटीच्या वस्तू या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात.[]

पर्यटकांसाठी आकर्षण

नाताळसाठीसजावटीच्या वस्तू

नाताळनिमित्त सजलेली बाजरपेठ हे विविध देशाच्या पर्यटनात भर घालणारे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. जगभरातील पर्यटक या बाजाराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात जगातील विविध नाताळ बाजार भरत असलेल्या ठिकाणांना भेट देतात.[]

जगातील प्रसिद्ध नाताळ बाजार

सजावट वस्तू विक्री

१. ख्रिस्तकिंडल मार्केट (Christkindlmarkt)- लेवेनवर्थ- वॉशिंग्टन

२. बर्मिंगहॅम फ्रांकफोर्ट (Birmingham’s Frankfurt Christmas Market)- इंग्लंड

३.झेग्रेब (Zagreb Advent)- क्रोएशिया

४. विलेज पेलेस (Village Belvedere Palace)- व्हिएन्ना- ऑस्ट्रिया

५. स्टेलेनबग (Stellenbosch Slow Market)- दक्षिण आफ्रिका

६. सन्तुरान्तिकू (Santurantikuy Market)- कुस्को-पेरू

७.शिकागो मार्केट (Christkindlmarket Chicago)-शिकागो

८. मेंचेस्तेर मार्केट (Manchester Christmas Market)- इंग्लंड

९. आखनेर मार्केट (Aachener Weihnachtsmarkt)- जर्मनी

१०. टोरांटो मार्केट (Toronto Christmas Market)-कॅनडा[]

भारत देशात

नाताळ बाजाराची लोकप्रियता भारत देशात पहायला मिळते. कोची, गोवा, दिल्ली, शिलॉंग अशा ठिकाणी रस्त्यांवर नाताळ बाजार भरविले जातात आणि पर्यटक त्यांचा आनंद घेतात.[१०]

हे ही पहा

  • ख्रिस्ती धर्म

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Network, Newsroom Odisha (2022-12-13). "All about the Christmas market in Frankfurt". News Room Odisha (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
  2. ^ a b Tahseen, Ismat. "The 7 best Christmas markets in the world". 6. 12. 2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b Sfetcu, Nicolae (2016-12-29). Christmas Holidays (इंग्रजी भाषेत). Nicolae Sfetcu.
  4. ^ "Frankfurt Christmas Markets in Great Britain | Frankfurt Tourism". web.archive.org. 2014-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-06 रोजी पाहिले.
  5. ^ Coffey, Helen. "UK'S BEST CHRISTMAS MARKETS". 10.12.2019 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Sengar, Resham. "Christmas markets in India that are a must-visit". Times of India Travel (इंग्रजी भाषेत). 2022-12-19 रोजी पाहिले.
  7. ^ Rodriguez, Cecilia (2.12.2019). "Holidays In Europe: 12 Beautiful Cities With The Best Christmas Markets". Forbes. 10.12.2019 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Thams, Kathrin (28.11.2019). "These are 10 of Germany's top Christmas markets in 2019". 10.12.2019 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Cashin, Rory. "The best Christmas markets in the world for 2019 have been named". Joe. 10.12.2019 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ December 16 2022, Shalmali TotadeLast Updated; Pm, 03:17. "7 Christmas Markets To Check Out In India This Holiday Season". swirlster.ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)