नाडी ज्योतिष
नाडी ग्रंथ भविष्य (इंग्रजी: Naadi Astrology तमिळ: 'நாடி ஜோதிடம்'/नाडि जोतिडम् )हा एक हिंदू ज्योतिष्यशास्त्राचा भाग आहे जो प्रामुख्याने भारतातील तमिळनाडू राज्यात पूर्वापार वापरात आहे. त्या शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ ताडपत्रावरील/भूर्जपत्रावरील ग्रंथांत (हस्तलिखित नाडीग्रंथांत) प्राचीन ऋषीमुनींनी लिहून ठेवला आहे. या ग्रंथांत ताडपट्टीवर हाताने लिहिलेल्या तमिळ भाषेच्या, कूट लिपीत व्यक्तीचे, त्याच्या आई-वडिलांचे व जोडीदाराचे नाव, जन्मदिनांक, जन्मकालीन ग्रहस्थिती यांची अचूक नोंद कोरून लिहिलेली असते. या शिवाय त्यांच्या जीवनात येणाऱ्या चढउतारांची व त्यावर करता येण्यासारख्या उपायांची नोंदही आढळते.
भारताच्या विविध भागात सध्या या भविष्य कथनाची ३००पेक्षा जास्त केंद्रे आहेत.
नाडी ग्रंथांमधील मजकूर, तमिळ भाषा, काव्य, ऐतिहासिकता आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून तमिळनाडू राज्यातल्या विद्यापीठांतून आणि भारतातील व भारताबाहेरील विद्यापीठांतून नाडीग्रंथांचा सखोल अभ्यास व्हायला हवा.
बाह्य दुवे
http://www.Shashioak.com Archived 2015-11-20 at the Wayback Machine. http://www.naadiguruonweb.org/ Archived 2010-07-02 at the Wayback Machine. नाडी ग्रंथ भविष्य[१]नाडीग्रंथ भविष्याविषयी मराठीतील लेखन व पत्रव्यवहार