नागरी लिपी
नागरी | |
---|---|
नागरी लिपी लिखित ताम्रपत्रे, इसवी सन १०३५ | |
प्रकार | अबुगिदा |
काळ | प्राथमिक वापर: पहिले शतक समकालीन विकास: इसवी सन ७ व्या शतकापासून |
पूर्वज प्रणाली | प्रोटो-सिनाईटिक अक्षरमाला[अ]
|
संतती प्रणाली |
|
भगिनी प्रणाली |
|
देवनागरी, नंदीनागरी आणि इतर काही लिप्यांचा विकास नागरी लिपी पासून झाला आहे. नागरी लिपीचा उपयोग पूर्वी प्राकृत व संस्कृत भाषांमध्ये लिहीण्यासाठी केला जात असे. बऱ्याचदा नागरी लिपीला देवनागरी लिपीदेखील संबोधले जाते.[१][२] इसवी सन पहिल्या सहस्रकादरम्यान नागरी लिपी प्रचलित झाली.[३]
आद्यकालीन ब्राह्मी लिपीपासून नागरी लिपीचा विकास झाला.[४] गुजरातमध्ये सापडलेल्या काही अतिप्राचीन शिलालेखांनुसार असे आढळून आले आहे की संस्कृत नागरी लिपीचा विकास आणि वापर प्राचीन भारतात इसवी सन पहिल्या ते चौथ्या शतकांदरम्यान झाला असावा.[५] सातव्या शतकापर्यंत नागरी लिपीचा नियमित वापर होत असे. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रक समाप्तीनजिक ही लिपी देवनागरी व नंदीनागरी लिपीमध्ये[६] पूर्णपणे विकसित झाली असे संशोधकांना आढळून आले आहे.[१][७]
मूळ
प्राचीन भारतामध्ये मध्य-पूर्वेकडील भागांमध्ये गुप्त लिपीसमवेत नागरी लिपीचा वापर रूढ झाल्याचे दिसून येते, कारण पश्चिमेकडे शारदा लिपी तर अति-पूर्वेकडे सिद्धम लिपी अधिक प्रमाणात वापरात होती. कालांतराने, नागरी लिपीचा देवनागरी व नंदीनागरी सारख्या लिप्यांमध्ये विकास झाला. तसेच, शारदा लिपीपासून विकसित झालेल्या गुरमुखी लिपीवरदेखील नागरी लिपीचा प्रभाव दिसून येतो.[ संदर्भ हवा ]
भारताबाहेर वापर
सातव्या शतकात तिबेटचा राजा स्रॉंग-त्सान-गंबो ने सर्व विदेशी पुस्तकांचे तिबेटी भाषेत भाषांतर करण्याचा आदेश दिला. त्याने त्याचा राजदूत तोन्मी संबोटा यास प्रादेशिक भारतीय भाषांतील आद्याक्षरे व लिहीण्याच्या पद्धती गोळा करण्यासाठी भारतात पाठविले. राजदूत संबोटाने काश्मिरमधील संस्कृत नागरी लिपी मधील २४ तिबेटी उच्चारांशी संलग्नित उच्चार शोधले. त्यासोबतच, त्याने ६ प्रादेशिक उच्चारांसाठी नवीन अक्षरांची भर घातली.[८]
म्यानमारच्या रखाइन राज्यात असलेल्या म्राव्क-वू (पूर्वीचे नाव, म्रोहॉंग) शहरातील संग्रहालयात सन १९७२ मध्ये नागरी लिपीचे दोन नमुने प्रदर्शनास ठेवण्यात आली. पुरातत्त्व शास्त्रज्ञ ऑंग थॉ लिहितात: "...६ व्या शतकात भारतातील वेसाली राजवंशाचे राजा नितिचंद्र व राजा विरचंद्र यांनी संस्कृत आणि पाली संमिश्रीत शिलालेख नम्रतेने समर्पित केले आहे ...".[९]
हेदेखील वाचा
संदर्भ
- ^ a b कॅथलिन किपर (२०१०), The Culture of India, New York: The Rosen Publishing Group, ISBN: 978-1615301492, पृष्ठ ८३
- ^ जिअॉर्ज कार्डोना आणि दानेश जैन (२००३), The Indo-Aryan Languages, Routledge, ISBN: 978-0415772945, पृष्ठे ६८ ते ६९
- ^ Devanagari through the ages, Issue 8 of Publication, India Central Hindi Directorate Issue 8 of Publication (Instituut voor Toegepaste Sociologie te Nijmegen). Published 1967 Original from the University of California. १९६७.CS1 maint: location (link)
- ^ जिअॉर्ज कार्डोना आणि दानेश जैन (२००३), The Indo-Aryan Languages, Routledge, ISBN: 978-0415772945, पृष्ठे ६८ ते ६९
- ^ Gazetteer of the Bombay Presidency, p. 30, गूगल_बुक्स वर, Rudradaman’s inscription from 1st through 4th century CE found in Gujarat, India, Stanford University Archives, pages 30-45
- ^ Nandanagiri Unicode Standards
- ^ रिचर्ड सालोमन (२०१४), Indian Epigraphy, Oxford University Press, ISBN: 978-0195356663, पृष्ठे ३३ ते ४७
- ^ विल्यम वुडवाइल रॉकहिल, Annual Report of the Board of Regents of the Smithsonian Institution, p. 671, गूगल_बुक्स वर, United States National Museum, पृष्ठ ६७१
- ^ Historical Sites in Burma, 1972