Jump to content

नागपूर मेट्रो टप्पा २

नागपूर मेट्रो टप्पा २ हा प्रकल्प नागपूर मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रकल्प आहे. नागपूर मेट्रोच्या बांधण्यात येणाऱ्या सध्याच्या मार्गिकांची लांबी याद्वारे वाढविण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच याचे काम सुरू करण्यात येईल.[]

महामेट्रोने याबबतचा आपला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला होता.राईट्स या रेल्वेच्या कंपनीने हा अहवाल तयार केला होता.सन २०१८ चे दरपत्रक लक्षात घेता, याचा खर्च सुमारे १०,५०० करोड रुपये इतका आहे.यात ३५ स्थानकांसह ५ विस्तारीत मार्ग आहेत. या सर्वांची एकत्रित लांबी सुमारे ४८.३ किमी इतकी राहील.[][]सन २०२४ पर्यंत या दुसऱ्या टप्प्यातून २.९ लाख प्रवासी प्रवास करतील असे अंदाजित आहे.[]

  • यातील एक टप्पा ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदीपर्यंत राहणार आहे.याची लांबी १३ किमी राहील व यात १२ स्थानके असणार आहेत.[][]खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस, कन्हान नदी, कन्हान रेल्वे स्थानक ही यातील स्थानकांची काही नावे आहेत.[]
  • दुसरा टप्पा हा लोकमान्य नगर ते हिंगणा असा असेल. याची लांबी ६.७ किमी राहील व यात सात स्थानके असतील.[][] नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, हिंगणा गाव, एमआयडीसी परिसर ही त्यातील काही स्थानकांची नावे आहेत.[]
  • यातील तिसरा टप्पा हा वासुदेवनगर ते दत्तवाडी असा राहणार असून हा सुमारे ४.५ किमी लांबीचा असेल व यात तीन स्थानके राहतील.[][][]एमआयडीसी परिसर, ऑर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड ही स्थानकांची नावे राहतील.[]
  • प्रजापतीनगर ते ट्रांसपोर्ट नगर हा या विस्ताराचा चौथा टप्पा असून तो ५.६ किमी लांबीचा असेल व यादरम्यान, ३ स्थानके असतील.[][] अंबेनगर, कापसी, ट्रांसपोर्ट नगर, आसोली ही यातील स्थानकांची नावे आहेत.[]
  • यातील सर्वात लांब टप्पा हा मिहान ते बुटीबोरी ईएसआर असा राहणार असून त्याची लांबी १८.५ किमी इतकी असेल व यात १० स्थानके असतील.[][] जामठा, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी , म्हाडा कॉलनी ,इंडोरामा कॉलनी ही यातील काही स्थानकांची नावे आहेत.[]

महाराष्ट्र राज्याच्या नागरी विकास खात्याने या वर नमूद प्रस्तावास मंजूरी दिली आहे.[] हा प्रस्ताव ११,२१६ कोटींचा असून,[]हा प्रस्ताव दिनांक ८ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल व त्यास मंजूरीनंतर तो केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.[]

या प्रस्तावास महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने दि. ०८-०१-२०१९ला मंजूरी दिली आहे.[];[]

या एकूण खर्चापैकी ६०% रक्कम ही महामेट्रोद्वारे कर्जामार्फत उभारण्यात येणार आहे. तर राज्य व केंद्र सरकार यापैकी प्रत्येकी २०% रक्कम देईल.[]

या कामास सुमारे ४ वर्षे लागतील असा अंदाज आहे.[]

हेही बघा

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h लोकमत न्यूझ नेटवर्क. लोकमत, नागपूर हॅलो नागपूर पुरवणी "'नागपूर मेट्रो फेज २'वर शिक्कामोर्तब" Check |दुवा= value (सहाय्य). ०९-०१-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)(मराठी मजकूर)
  2. ^ a b c d e f आशिश रॉय. "Metro Phase-II detailed project report submitted to government". ०२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c d e f g h रोहित कुमार. "http://railanalysis.in/rail-news/nagpur-metro-update-dpr-phase-ii-ready/". 2019-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  4. ^ a b c d Anjaya Anparthi. "State UDD clears Metro rail phase-II costing 11,216 cr". ०२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "State Cabinet gives nod to Rs. 11,239 crore Phase 2 of Nagpur Metro rail project". ०९-०१-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)