Jump to content

नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रो
चित्र:Nagpur Metro Logo.svg
स्थाननागपूर, महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
वाहतूक प्रकारमेट्रो
मार्ग
मार्ग लांबी ४३ किमी कि.मी.
एकुण स्थानके ४२
दैनंदिन प्रवासी संख्या ३,६३,००० (अंदाजित)
सेवेस आरंभ ८ मार्च २०१९
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

नागपूर मेट्रो ही नागपूर शहरात उभारण्यात येत असणारी मेट्रो प्रणाली आहे. याच्या नागपूर मेट्रो टप्पा २ या मूळ नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आलेली आहे.[] महाराष्ट्र सरकारने हिच्या बांधणीसाठी २९ जानेवारी २०१४ रोजी मंजूरी दिली.[ चित्र हवे ][][] मुंबई मेट्रो नंतर महाराष्ट्रात नागपूर मेट्रो उभारण्यात येणार आहे.[] हा प्रकल्प सुरू होईल.[][] या प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात ३१ मे २०१५ रोजी झालेली आहे.[] भारताच्या केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाल्यावर व 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' लागू झाल्यावर २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजूरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या प्रकल्पावर ३० सप्टेंबर २०१७ रोजी ट्रायल रन घेण्यात आला. या प्रकल्पाचा एक भाग, म्हणजे यातील केशरी मार्गिका आधी सुरू होईल असा अंदाज आहे.[ संदर्भ हवा ]

या संपूर्ण प्रकल्पापैकी रिच-१ (सिताबर्डी ते खापरी) हा तेरा किमीचा टप्पा व रिच-३ मधील लोकमान्यनगर ते सुभाषनगर हा मार्ग, व्यावसायिक वापरासाठी फेब्रुवारी २०१९ अखेरीसपर्यंत तयार होईल असा अंदाज वर्गविण्यात आला आहे.[][] या मेट्रोमध्ये एकूण तीन डबे रहाणार असून महिलांसाठी राखीव असणाऱ्या कोचला 'नारीशक्ती' असे नाव देण्यात आलेले आहे.[]

प्रकल्पाची कारणमीमांसा

नागपूर शहराची लोकसंख्या अंदाजे २४ लाख असून या महानगराच्या सभोवताली असलेल्या ९ तालुक्यांची संख्या ३२.७२ लाख आहे. या शहरात बहुसंख्य इंधनचलित छोटी वाहने आहेत. दुचाकी १०.३३ लाख, तीन चाकी ०.१७ लाख, चारचाकी १.८७ लाख, अशी एकूण वाहने १२.३७ लाख आहेत. या सर्वांमुळे वाहतुकीवर पडणारा ताण, छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण, पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला.[]

प्रकल्प अहवाल

या प्रकल्पाचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने तयार केला होता.[][१०]

तपशीलवार प्रकल्प अहवाल

यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आपला प्रकल्प अहवाल या प्रकल्पाची नोडल एजन्सी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला दि. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी सादर केला.[११] या प्रकल्पाची अंदाजित संपूर्ण किंमत ही ९० अब्ज रुपये इतकी आहे. यात दोन मार्गिका राहतील.

  • क्र.१ - कामठी रस्त्यावरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान स्थित मेट्रो डेपो व
  • क्र. २ - पूर्व वर्धमान नगरातील प्रजापती नगर ते लोकमान्य नगर हिंगणा. मार्गिका क्र. १ वर १७ स्थानके राहतील. या मार्गाची समाप्ती मिहान येथे होईल. तेथेच याचे टर्मिनलही असेल. तर, मार्ग क्र. २ वर १९ स्थानके राहतील. या मार्गाच्या लोकमान्यनगर येथे टर्मिनल असेल. मुंजे चौक सिताबर्डी येथे या दोन्ही मार्गिका छेदतील. येथे प्रवासी आपला मार्ग बदलू शकतील.

इ.स. २०२१ पर्यंत नागपूरच्या अंदाजित २.९ लाख लोकसंख्येच्या १२.२१% प्रवासी ही सेवा वापरतील असे अपेक्षित आहे. हा आकडा सुमारे ३६३००० इतका होतो.

स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशास पुढे इच्छित स्थळी मार्गक्रमणासाठी, शटल बसेस, बॅटरीवर चालणारी वाहने, पादचारी सेवा व सहभागी तत्त्वावर सायकली इत्यादी गोष्टींच्या पुरवठ्याचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. सर्व वर्गातील प्रवाशांना ही सेवा उपलब्ध असेल जेणेकरून त्यांना आपले घर अथवा कार्यालयातून मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल.[१२]

प्रकल्पाचे फायदे

कायमस्वरूपी वेगवान व विनाअडथळा वाहतूक, वायू व ध्वनी प्रदूषणात घट, इंधन बचत, परकीय चलनात बचत, सध्या असलेल्या सार्वजनिक बस वाहतुकीस उत्तम पर्याय.[]

वित्तपुरवठा

या प्रकल्पासाठी प्राथमिक अंदाजित, ६६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (सुधारित:८६८० कोटी रुपये)[] या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी ही जपानमधील वित्तीय संस्था १.४ टक्के दराने वित्तपुरवठा करणार आहे. एकूण खर्चापैकी ५० % एवढी रक्कम कर्जरूपात उभारण्यात येणार आहे. यात उरलेल्या ५० टक्क्याची वाटणी खालील प्रमाणे राहील : भारत सरकार :२० %, महाराष्ट्र राज्य शासन : २० % , नागपूर महानगरपालिकानागपूर सुधार प्रन्यास प्रत्येकी ५ % रक्कम.[]

वित्तीय परतावा

मेट्रोच्या तिकिटांपासून होणारे उत्पन, जाहिरातीद्वारे होणारे उत्पन, स्थानके व डेपो क्षेत्रांत वाणिज्यिक विकसनाद्वारे निधी उभारणी, महानगरपालिका विकसन शुल्क, आदींद्वारे मिळणारा वित्तीय परतावा १०.३५ टक्के राहील.[]

प्रस्तावित खर्च

अनुमानित वर्षनिहाय खर्च असा आहे[१३]:

वित्तीय वर्षप्रस्तावित खर्च (कोटी रुपये)
२०१३-१४४५२
२०१४-१५१०२१
२०१५-१६१८७४
२०१६-१७२४१२
२०१७-१८१९८३
२०१८-१९७४०
२०१९-२०२०१९८

भूसंपादन

या प्रकल्पासाठी एकूण ७७.६८ हेक्टर (७७६८१९.३० चौ मी) जमीन लागणार आहे. पैकी मिहान प्रकल्पाजवळ ३३.९० हेक्टर (मार्ग क्र.१) तर नीलडोह येथे १५.२४ हेक्टर (मार्ग क्र.२) जमीन घेण्यात येणार आहे.[१३]

वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वेचे व्हायाडक्ट

इतिहास व पूर्वीचा प्रस्ताव

नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, याचे कार्य जानेवारी २०१३ पासून सुरू होणार आहे. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०१३ पासून कार्याला प्रारंभ होईल आणि डिसेंबर २०१६ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. नागपूरची लोकसंख्या वर्तमानात २५ लाख असून, २०३० पर्यंत ही आकडेवारी ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ॲण्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटर पर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हणले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी नाका ते वाडी नाका, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर तिसऱ्या टप्प्यात फुटाळा तलाव ते धंतोली असा मार्ग प्रस्तावित केला होता.

सध्याचा प्रस्ताव

खालील प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली आहे. येथील कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान असा १९.६५ किमीचा एक मार्ग तर दुसरा मार्ग प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असा १८.५५ किमीचा मार्ग असेल. यातील एकूण लांबीपैकी ३३.६१ किमी हा उन्नत(एलिव्हेटेड) स्वरूपात तर ४.६० किमी मार्ग हा भूपृष्ठावरून असेल. या एकूण मार्गाचे लांबी सुमारे ३८.२१ किमी राहील.[]

कार्यान्वयन संस्था व इतर संस्था

या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यास या नागपूरच्या विकासासाठी असलेल्या संस्थेची 'कार्यान्वयन संस्था' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' हा केंद्रिय मंत्रिमंडळाकडून लागू करवून घेणे इत्यादी कामे ही संस्था करणार आहे.[]

पुढे, या प्रकल्पाचे संचलन व अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक 'स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी' (विशिष्ट प्रयोजन वाहन कंपनी) स्थापण्यात येणार आहे. ही कंपनी स्थापन होईपर्यंत व त्या कंपनीला हे काम सोपवेपर्यंत, नासुप्र हे काम करीत राहील.[] यात राज्य शासन, महानगरपालिका व नासुप्रचे सहा संचालक राहतील. या सर्वांवर एक उच्चाधिकार समिती राहील.[१३]

कार्यारंभ व समाप्ती

सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात याचा आरंभ होणार असे प्रस्तावित आहे. हे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.[][१३]

मेट्रोचे प्रशासकीय भाग

प्रशासकीय व बांधकाम या दोन्ही गोष्टींसाठी सोयीचे व्हावे म्हणून नागपूर मेट्रोच्या मार्गिकांना रिच-१, रिच-२, रिच-३ व रिच-४ असे विभागण्यात आले आहे. यापैकी रिच १ हा टप्पा खापरी ते सिताबर्डी मेट्रो स्थानक असा आहे. रिच-२ हा टप्पा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते ऑटोमोटिव्ह चौक असा आहे. रिच-३ हा टप्पा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते लोकमान्यनगर असा आहे, तर रिच ४ हा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते प्रजापतीनगर असा आहे.[][]

यातील मार्गिकांची अंतिम आखणी

नागपूर मेट्रोमधील केशरी व अ‍ॅक्वा मार्गिकांची अंतिम आखणी खालीलप्रमाणे असेल :

मार्ग १ : (केशरी मार्गिका)

नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण)
विवरण
ऑटोमोटिव्ह चौक
नारी रोड
इंदोरा चौक
कडबी चौक
गड्डीगोदाम चौक
कस्तुरचंद पार्क
झिरो माइल फ्रीडम पार्क
सिताबर्डी
काँग्रेसनगरअजनी रेल्वे स्थानक
रहाटे कॉलनी
अजनी चौक
छत्रपती चौक
जयप्रकाशनगर
उज्ज्वलनगर
विमानतळडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळ दक्षिण
न्यू एअरपोर्ट
खापरीखापरी रेल्वे स्थानक
एको पार्क
मेट्रो सिटी
.

उत्तर - दक्षिण :ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान, विमानतळ मार्गे (केशरी मार्गिका) :[१४] प्रवाशांसाठी एकूण १७ स्थानके. (मार्गिकेची लांबी :१९.६५8 किमी; स्थानकांची संख्या :२०[१५])

या संपूर्ण मार्गिकेची लांबी (म्हणजे १९.६५८ किमी) ही पूर्णतः उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे. फक्त मिहान क्षेत्रामधील विमानतळ स्थानकानंतर खापरी रेल्वे स्थानकापर्यंत त्यात ४.६ किमी इतकी लांबी भू-पातळीवरच (तेथील जमिनीच्या पातळीवरच) असेल. यांत एकूण स्थानके २० आहेत. ज्यापैकी १५ स्थानके ही उन्नत असतील तर, ५ स्थानके ही भू-पातळीवर (जमिनीच्या पातळीवर) असतील. यापैकी सिताबर्डी स्थानक हे अदलाबदली (इंटरचेंज) स्थानक असेल. या मार्गिकेत असलेल्या स्थानकांचे आप-आपसामधील अंतर सरसरी १.२० किमी आहे, पण त्यात, दोन स्थानकांमधील ०.५४ किमी इतके कमी अंतर ते २.४ किमी महत्तम अंतर हा फरकही आहे. हा फरक स्थानकाच्या जागेच्या उपलब्धतेनुसार व संचालनाच्या तसेच प्रवासी आवश्यकतेच्या अनुसार करण्यात आला आहे.

प्रस्तावित स्थानकांची नावे :ऑटोमोटिव्ह, नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, शून्य मैल, सिताबर्डी, काँग्रेस नगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाश नगर, उज्जवलनगर, जुना विमानतळ, नवा विमानतळ, खापरी मेट्रो डेपो.[] यात पूर्वी असलेला, मार्ग क्र. १ मधील 'भुयारी मार्ग' वगळण्यात आलेला आहे.[]

मार्गिकेच्या विवरणाचा तक्ता

स्थानक क्र.स्थानकाचे नावअंतर (मिटर्समध्ये)मागील स्थानकापासूनचे अंतरस्थिती
ऑटोमोटिव्ह चौक०.००.०उन्नत
नारी रोड९७५.८९७५.८उन्नत
इंदोरा चौक२१३९.७११६३.९उन्नत
कडबी चौक३१८१.२१०४१.५उन्नत
गड्डीगोदाम चौक४३९९.०१२१७.८उन्नत
कस्तुरचंद पार्क५१४८.६७४९.६उन्नत
शून्य मैल६१७५.५१०२६.९उन्नत
सिताबर्डी (अदलाबदली स्थानक)६७०९.२५३३.७उन्नत
काँग्रेस नगर७८९७.२११८८.०उन्नत
१०रहाटे कॉलनी८६८२.६७८५.४उन्नत
११अजनी चौक१०१०४.७१४२२.१उन्नत
१२छत्रपती चौक१११४६.३१०४१.६उन्नत
१३जयप्रकाश नगर११८११.५६६५.२उन्नत
१४उज्ज्वल नगर१२८४६.६१०३५.१उन्नत
१५विमानतळ१३७८४.९९३८.३उन्नत
१६विमानतळ दक्षिण--भू-पातळीवर
१७नवीन विमानतळ१६१८४.४२३९९.५भू-पातळीवर
१८खापरी१८४६०.६२२७६.२भू-पातळीवर
१९एको पार्क--भू-पातळीवर
२०मेट्रो सिटी--भू-पातळीवर

मार्ग २ : (अ‍ॅक्वा मार्गिका)

नागपूर मेट्रो अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम)
विवरण
प्रजापतीनगर
वैष्णोदेवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितारओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानकनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स
शंकरनगर चौक
एलएडी चौक
धरमपेठ महाविद्यालय
सुभाषनगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेवनगर
बंसीनगर
लोकमान्यनगर
हिंगणा माउंट व्ह्यू
.
नागपूर मेट्रोचा उन्नत मार्ग

पूर्व-पश्चिम :प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर (अ‍ॅक्वा मार्गिका): एकूण स्थानके १९

ही मार्गिका प्रजापतीनगर या स्थानकापासून सुरू होते व त्यानंतर पश्चिम दिशेस वैष्णोदेवी चौक इत्यादी स्थानकांवरून सिताबर्डी मार्गे लोकमान्यनगर या अंतिम स्थानकास पोहोचते. हा सर्व मार्ग उन्नत आहे.

या स्ंपूर्ण मार्गिकेची लांबी ही १८.५५७ किमी इतकी असून यावर २० स्थानके आहेत. यातील सिताबर्डी स्थानक हे अदलाबदली (इंटरचेंज) स्थानक आहे. या मार्गिकेतील दोन स्थानकांदरम्यानचे सरासरी अंतर हे एक किमी आहे. स्थानकांच्या जागेच्या उपलब्धतेनुसार, हे कमीतकमी ०.६५ किमी ते महत्तम १.२९ किमी इतकेही आहे. हा फरक मेट्रोचे संचालन व प्रवासी आवश्यकता यांचाही विचार केला गेल्यामुळे पडला आहे.

प्रस्तावित स्थानकांची नावे : प्रजापतीनगर, वैष्णोदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, चितार ओळी चौक, दोसर वैश्य चौक, रेल्वे स्थानक, सिताबर्डी (इंटरचेंज), झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, शंकर नगर (बँक ऑफ इंडिया), एल ए डी चौक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सुभाष नगर, रचना रिंगरोड जंक्शन, वासुदेवनगर, बन्सीनगर, लोकमान्य नगर मेट्रो डेपो. (संपूर्ण उन्नत मार्ग)

या मार्गिकेचा विवरण तक्ता

स्थानक क्र.स्थानकाचे नावअंतर (मितर्समध्ये)मागील स्थानकापासून अंतरस्थिती
प्रजापती नगर०.००.०उन्नत
वैष्णो देवी चौक१२२९.३१२२९.३उन्नत
आंबेडकर चौक१९४७.९७१८.६उन्नत
टेलिफोन एक्स्चेंज३१३७.४११८९.५उन्नत
चितार ओळी चौक३९५०.२८१२.८उन्नत
अग्रसेन चौक४७५९.८८०९.६उन्नत
दोसर वैश्य चौक५५९०.४८३०.६उन्नत
नागपूर रेल्वे स्थानक६४६४.४८७४.०उन्नत
कॉटन मार्केटउन्नत
१०सिताबर्डी (अदलाबदली स्थानक)७७०७.७१२४३.३उन्नत
११झाशी राणी चौक८३५४.०६४६.३उन्नत
१२इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स९११७.२७६३.२उन्नत
१३शंकर नगर चौक१००७४.९९५७.७उन्नत
१४एलएडी चौक१०८७३.१७९८.२उन्नत
१५अंबाझरी तलाव१२०२०.७११४७.६उन्नत
१६सुभाष नगर१२९४७.१९२६.४उन्नत
१७रचना रिंग रोड जंक्शन१४२०१.११२५४.०उन्नत
१८वासुदेव नगर१५१७३.९९७२.८उन्नत
१९बंसी नगर१६१३१.६९५७.७उन्नत
२०लोकमान्य नगर१७७९२.६१६६१.०उन्नत
२१हिंगणा माऊंट व्ह्यू--उन्नत

तांत्रिक माहिती

या प्रकल्पाची तांत्रिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

बाबवर्णनशेरा
गेज१४३५ मि मी-
वेग९५ किमी प्रति तासमहत्तम
विद्युत पुरवठा२५ के.व्ही.ओव्हरहेड
बोगी-
एका मेट्रोची प्रवासी संख्या७६४-
प्रवासी हाताळणीची दैनंदिन क्षमता३ लाख(अपेक्षित)
तिकिटस्वयंचलित व स्मार्टकार्ड-
डब्यांचा प्रकारस्टेनलेस स्टीलवातानुकूलित
सिग्नल पद्धतीएटीपी व एटीओ-
स्थानक सुविधाउद्वहन, एस्केलेटर्स, जिने-
दोन्ही मार्ग जंक्शनमुंजे चौकएका मार्गावरून दुसऱ्यावर जाण्याची सोय[]
वारंवारतादर सहा मिनिटे-[]

प्रस्तावित भाडे

हे सन २०१९ मधील प्रस्तावित भाडे आहे.यात सुधारणा करण्याचे अधिकार भाडे निश्चिती समितीकडे आहेत.[१३]

प्रवास अंतर (किमी)भाडे (रु.)
० ते २१५
२ ते ४१९
४ ते ६२३
६ ते ९२८
९ ते १२३०
१२ ते १५३४
१५ ते १८३६
१८ ते २१३९
२१ पेक्षा जास्त४१

नाव

या प्रकल्पाचे नाव माझी मेट्रो राहणार आहे.[१६]

प्रकल्पाचा नागपूरशेजारच्या गावांपर्यंत विस्तार

नागपूर शहरासोबतच त्याशेजारील गावांचाही विकास व्हावा या उद्देशाने नागपूर मेट्रोची व्याप्ती भंडारा, रामटेक, काटोल व वर्धा येथवर करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. हा पुढील प्रकल्प ३३० कोटींचा आहे.[१७]

नागपूर मेट्रो टप्पा २

महामेट्रोने याबबतचा आपला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला होता.राईट्स या रेल्वेच्या कंपनीने हा अहवाल तयार केला होता. सन २०१८ चे दरपत्रक लक्षात घेता, याचा खर्च सुमारे १०,५०० करोड रुपये इतका आहे.यात ३५ स्थानकांसह ५ विस्तारीत मार्ग आहेत. या सर्वांची एकत्रित लांबी सुमारे ४८.३ किमी इतकी राहील.[१८][१९]

  • यातील एक टप्पा ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदीपर्यंत राहणार आहे. याची लांबी १३ किमी राहील व यात १२ स्थानके असणार आहेत.[१८][१९]
  • दुसरा टप्पा हा लोकमान्यनगर ते हिंगणा असा असेल. याची लांबी ६.७ किमी राहील व यात सात स्थानके असतील.[१८][१९]
  • यातील तिसरा टप्पा हा वासुदेवनगर ते दत्तवाडी असा राहणार असून हा सुमारे ४.५ किमी लांबीचा असेल व यात तीन स्थानके राहतील.[१८][१९]
  • प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्ट नगर हा या विस्ताराचा चौथा टप्पा असून तो ५.६ किमी लांबीचा असेल व यादरम्यान, ३ स्थानके असतील.[१८][१९]
  • यातील सर्वात लांब टप्पा हा मिहान ते बुटीबोरी ईएसआर असा राहणार असून त्याची लांबी १८.५ किमी इतकी असेल व यात १० स्थानके असतील.[१८][१९]

महाराष्ट्र राज्याच्या नागरी विकास खात्याने या वर नमूद प्रस्तावास मंजूरी दिली आहे.[२०] हा प्रस्ताव ११,२१६ कोटींचा असून,[२०] हा प्रस्ताव दिनांक ८ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल व त्यास मंजूरीनंतर तो केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.[२०]

या प्रस्तावास महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने दि. ०८-०१-२०१९ ला मंजूरी दिली आहे.[][२१]

या एकूण खर्चापैकी ६०% रक्कम ही महामेट्रोद्वारे कर्जामार्फत उभारण्यात येणार आहे. तर राज्य व केंद्र सरकार यापैकी प्रत्येकी २०% रक्कम देईल.[२०] या कामास सुमारे ४ वर्षे लागतील असा अंदाज आहे.[१९]

दोन्ही टप्प्यांचा एकत्रित लेखाजोखा

नागपूर मेट्रोचा मूळ प्रकल्प (टप्पा १) व नागपूर मेट्रो टप्पा २ या दोन्ही प्रकल्पात करण्यात येणारी एकूण गुंतवणूक १९,८९६ कोटी इतकी राहील. दोन्ही टप्प्यांची एकत्रित लांबी ही ८६ किमी इतकी राहील. त्यात दोन्ही मिळून ७३ स्थानके असतील. सन २०२४ पर्यंत, नागपूर मेट्रोच्या प्रथम टप्प्यात २.६ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २.९ लाख इतके प्रवासी दररोज प्रवास करतील असे अंदाजित आहे. तर, सन २०२९ पर्यंत हाच आकडा पहिल्या टप्प्यातून २.९ लाख तर दुसऱ्या टप्प्यातून सुमारे ३.४ लाख दररोजचे प्रवासी इतका असेल. सन २०४१ पर्यंत यात दररोज एकूण ७.७ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज करून या प्रकल्पाची एकूण आखणी करण्यात आलेली आहे.[]

संदर्भ

  1. ^ a b c लोकमत न्यूझ नेटवर्क. लोकमत, नागपूर हॅलो नागपूर पुरवणी "'नागपूर मेट्रो फेज २'वर शिक्कामोर्तब" Check |दुवा= value (सहाय्य). ०९-०१-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)(मराठी मजकूर)
  2. ^ a b c d e f जोशी, यदु. "लेखमथळा:नागपुरात मेट्रो धावणार". २३ जानेवारी २०१४ रोजी पाहिले. वित्त,नियोजन विभागाची हिरवी झेंडी Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ a b c d e f g "लेखमथळा:मेट्रोनगरी". ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. नागपूरकरांसाठी 'ड्रीम प्रोजेक्ट': प्रवास होणार सुखकर Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
  4. ^ a b c d e तरुण भारत,नागपूर,आपलं नागपूर पुरवणी, ई-पेपर,दि.३०/०१/२०१४, "नागपूर मेट्रो रेल्वेला शासनाची मंजूरी" Check |दुवा= value (सहाय्य). ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  5. ^ Ashish Roy (30 May 2015). "Metro rail work set to begin from Sunday". The Times of India. 20 June 2015 रोजी पाहिले.
  6. ^ a b लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check |दुवा= value (सहाय्य). १३-०२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ a b लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check |दुवा= value (सहाय्य). १३-०२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. लोकमत नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान २ "आरडीएसओ उद्या करणार मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे परीक्षण" Check |दुवा= value (सहाय्य). १३-०२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "'मेट्रो'च्या अहवालाची प्रतीक्षा कायम". ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)
  10. ^ "नागपुरातील मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी". ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)
  11. ^ [१][मृत दुवा]साचा:Cbignore
  12. ^ "NMRCL - Project Profile". www.metrorailnagpur.com.
  13. ^ a b c d e "लेखमथळा:नागपूर मेट्रो रेल्वेला मान्यता". ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. '३८.२१५ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग' Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
  14. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
  15. ^ "Detailed report chapter 6" (PDF). Metro Rail Nagpur. 24 September 2015 रोजी पाहिले.
  16. ^ "चीनसोबत करार विकासाचा नवा अध्याय:मुख्यमंत्री". तरुण भारत नागपूर या दैनिकाच्या ई-पेपरचे संकेतस्थळ. १६/१०/२०१६ रोजी पाहिले. नागपूरात माझी मेट्रो तर पुण्यात महा मेट्रो |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ म. टा. वृत्तसेवा, भंडारा. महाराष्ट्र टाइम्स, नागपूर. "नागपूर मेट्रो भंडाऱ्यापर्यंत" Check |दुवा= value (सहाय्य).[permanent dead link]
  18. ^ a b c d e f आशिश रॉय. "Metro Phase-II detailed project report submitted to government". ०२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  19. ^ a b c d e f g रोहित कुमार. "http://railanalysis.in/rail-news/nagpur-metro-update-dpr-phase-ii-ready/". 2019-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  20. ^ a b c d Anjaya Anparthi. "State UDD clears Metro rail phase-II costing 11,216 cr". ०२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  21. ^ -. "State Cabinet gives nod to Rs. 11,239 crore Phase 2 of Nagpur Metro rail project". ०९-०१-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे