Jump to content

नागदिवाळी

नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्यांतील प्रत्येकाच्या नावाने एकेक पक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा यात हेतू असतो.

स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे

शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी ।
स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥

या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने व एकभुक्त व्रत केल्याने फलप्राप्ती होते.