नागठाणा (गंगाखेड)
?नागठाणा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गंगाखेड |
जिल्हा | परभणी |
भाषा | मराठी |
सरपंच | |
मराठी | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • 431514 • एमएच/22 |
नागठाणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
==प्रेक्षणीय स्थळे== येथे, नागनाथाचे म्हणजेच महादेवाचे प्राचीन जागृत मंदिर आहे. नागनाथचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूर वरून येत असतात. महाशिवरात्रीच्या अमावास्येला येथेही यात्रा भरते. लग्न समारंभ अशा अनेक समारंभासाठी रमणीय आणि शांत ठिकाण म्हणून गावाची मोठी ओळख आहे.
==नागरी सुविधा== गावात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊले उचलली जातात. समारंभासाठी पूर्ण व्यवस्था केली जाते. याच कारणाने शेजारील गावातील लोक सुद्धा नागठाना गावात आपले समारंभ साजरे करतात.
==जवळपासची गावे== गावाच्या पश्चिम दिशेला असलेले पिंपरी(झोला) या गावाचे पोस्ट ऑफिस नागठाना गावाला जोडले आहे. नागठाना गावात प्रवेश करताना मुळी गावातून जावे लागते. हे नागठाणाच्या पूर्वेस आहे. दक्षिणेस झोला गाव तर उत्तरेस अंगलगाव आहेत. गावाला तीन बाजूने गोदावरी नदीने घेरले. गोदावरीच्या काठाने गावचे तीन टोक अगदी रमणीय दिसतात.