Jump to content

नागज

  ?नागज

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकवठे महांकाळ
जिल्हासांगली जिल्हा
भाषामराठी
सरपंचतानाजी गणपत शिंदे
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 416403
• +०२३४१
• एमएच/10

नागज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

नागज हे NH-166 (रत्‍नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग) व NH-166E (विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग) वरील गाव आहे. हे दोन महामार्ग एकमेकांना नागजजवळ छेदतात.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

==लोकजीवन== नागज हे गाव सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येते.चोहोबाजूंनी महादेवाच्या डोंगरांगांच्या शेवटचा भाग असल्याने गाव डोंगरी भागात आहे.नजिकच्याच हरणेश्वर डोंगरभागात उगम पावणारी व वर्षांतील आठ दहा महिने वाहणारी बेलवण नदी गावाला पश्चिम दक्षिण पुर्व असा वेढा घालून वाहते,तर नागझरी ओढा,खोल ओढा,सनगर ओढा, चांभार ओढा हे गावातील इतर हंगामी पाण्याचे स्रोत आहेत.तसेच एक मोठा पाझर तलाव असून इतर छोटे मोठे तलाव आहेत. गावाला लागूनच वनविभागाचे जंगल असून ते अतिशय मोठे व हिरवेगार आहे.सन 2015पासून मुख्य बेलवन नदीपात्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सातत्याने सोडले जात असल्याने ही नदी बारमाही बनली आहे.शेती हा नागज येथील मुख्य व्यवसाय आहे.शेतीमध्ये प्रामुख्याने द्राक्षे, डाळिंब,चिकू,व केळीच्या बागा इ.भरपूर प्रमाणात आहेत.तसेच रबी हंगामात बाजरी,मका, गळीत धान्य,व कडधान्ये इ.पिके तर रब्बी हंगामात ज्वारी,गहु, हरभरा, करडई,इ.पिके घेतली जातात.पुर्वीपासूनच या गावात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.प्रामुख्याने येथील कृषक वर्गात खिलार गाई, पंढरपुरी,देशु,गवळारु म्हैशी व शेळ्या मेंढ्या कोंबड्या इ कळप घरोघरी आढळून येतात.अलाकडील काळात विदेशी भरपूर दूध उत्पादन देणाऱ्या गाईंची संख्या वाढली आहे.गावाला स्वतःची अशी सर्व प्रकारची संपन्न अशी जुनी लांबसडक मध्यवर्ती बाजारपेठ आहे.किराणा,भुसार, रिटेल, होलसेल व हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बांधकाम साहित्याचे दुकाने, कृषी सेवा केंद्र,दुध संकलन व विक्री केंद्र,बेकरी पदार्थ उत्पादन ,व शेती उपयोगी साहित्यांची मोठ्या आस्थापना आहेत.गावामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या सोबत, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर दोन तीन सहकारी पतपुरवठा संस्था आहेत.तसेच गावामध्ये सुमारे आठ दहा अंगणवाडी असून एक उर्दू माध्यमांची शाळा,दोन प्राथमिक शाळा व एक पुर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.तसेच दोन माध्गायमिक शाळा असून , त्यातील श्री सिद्धेश्वर हायस्कूल मध्ये सेमि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते.तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सुद्धा दिले जाते.गावामध्ये दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.भाजीपाला ,फळे,अंडी,मांस, धान्य व इतर खादयवस्तु इ.गावातील नागरिकांबरोबरच पंचक्रोशीतील नागरिक खरेदी व्यवहार करतात.अलिकडील काळात नागज गावाबरोबरच विजापूर -गुहागर ,व नागपूर -रत्‍नागिरी या दोन राष्ट्रीय महामार्गांना छेदणारा नागज पाटा हे गावातीलच एक नव्याने विकसित होणारे केंद्र बनले आहे.या ठिकाणी दवाखाने, वाहतुकीच्या सोयी, पेट्रोल पंप,स्पेअर पार्ट दुकाने व विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल सुरू होत आहेत.गावामध्ये हिंदू धर्मातील लोकांचे श्री रेणुका माता मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री बिरोबा बन मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री सिद्धनाथ मंदिर, श्री खंडोबा मंदिरे, श्री जोतिबा मंदिर, श्री विठ्ठल मंदिर व पंचदेवता मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, श्री दत्त मंदिर इ.तर मुस्लिम समाजाची मस्जिद व बौद्धांचे बुद्धविहार सुद्धा आहे.श्री रेणुकामाता मंदिर बेलवन नदीपात्रात असून दरवर्षी मार्गशीर्ष अमावास्याचे आधी दोन दिवस आधी येथे मोठी यात्रा भरते.हजारो भाविकांची गर्दी याठिकाणी होते.येथून जवळच नागज-आरेवाडी-ढालगाव या तीन गावच्या शिवेवर देशभर प्रसिद्ध असं आरेवाडीचे बिरोबा बन मंदिर आहे.तर नागज येथील डोंगरावर सुमारे चार किलोमीटर अंतरावर श्री शंभू महादेवाचे मंदिर असून प्राचीन काळापासून असलेले हे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे.दर बारा वर्षांनी येथील कुंडात भागिरथी नदी येते अशी आख्यायिका आहे.पावसाळ्यात विशेषतः श्रावणात हजारो भाविक येथील निसर्गाच्या सान्निध्यात धुंद होऊन जातात.

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे==ढालगाव,आरेवाडी,केरेवाडी,रायेवाडी,किडेबिसरी,निमज

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate