नागचाफा
नागचाफा किंवा नागकेशर हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले व कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे.
वनस्पती
- हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते.
- पाने टोकदार भाल्याचा पात्यासारखी असतात. कोवळी असतात तेव्हा त्यांचा रंग अतिशय आकर्षक लालसर असतो. जुनी झालेली पाने खालच्या बाजूने पांढरट आणि स्पर्शाला कडक असतात.
- फुलांमध्ये मोठ्या चार पांढऱ्या पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे असंख्य पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात. नागचाफ्याची फुले शंकराला वाहतात.
चार दिवसात परत नवीन कवळी नवीन पाने झुपक्यानी कवेत घ्यायला झाडांवर हजर होतात. हे झाड उंच वाढते. याचा पसारा खाली जास्त नसतो. ५० ते ७५ फुट उंच वाढणाऱ्या या झाडाच्या १५ ते २० फुटपर्यंत खोडाला फुले व फळे लागतात. तशा या झाडाला खोल पर्यत तारुण्य पीठिका येतात. खोडाच्या चारी बाजूंनी हिरवी कोंब येतात. त्यातून मंग फांदी फुटते. ती २ ते ५ फुटपर्यंत मोठी सुद्धा होते. त्यालाच लागुन २० - २५ काळ्याचे झुमके वाटण्याच्या आकारापासून लिंबाच्या अकरापर्यंत ह्या काळ्या मोठ्या होत जातात. पाकळी खालच्या बाजूला आतून जाड असते. आतील गोल भाग जो शंकराची पिंड समजली जाते. त्याचे संरक्षण कारायचे बहुदा पाटी पुसायचा गोल डबीतला स्पंज दिसतो तसा दिसणारा हा भाग म्हणजे या फुलातील श्रीकेसर आहे. हे केशर म्हणजेच औषधांमध्ये मूल्यवान गणले जाणारे नागकेशर. पाकळ्या उमलल्या की मग तो दिसतो. याची पाने सारखी गळतात. त्यामुळे कचरा होतो. या झाडाची मुळे वेडीवाकडी खोलवर जातात यामुळे हे झाड त्रासदायक ठरते. आणखी एका कारणासाठी हे झाड फक्त देवळे, सार्वजनिक बागा, हॉस्पिटल कंपनी अशा आवारातच दिसते. ते म्हणजे त्याचे फळ! एका वेळी तोफ गोळयाच्या आकाराची शे दीडशे फळे झाडाला लागतात. फळाचे वजन असते एक दीड किलो. फळ मोठे असल्यामुळे झाडावर आठ नऊ महिने लागतात. त्या फळाचा अतिशय घाण वास येतो. म्हणूनच हे झाड सर्वत्र दिसत नाही. भारतात ह्या फळाचा उपयोग माहित नाही. गीयानात मात्रे ही फळे गाई, गुरे माकडे खातात काही ठिकाणी त्याचे पेय बनवतात. कैलासपतीची दोन सुंदर झाडे चर्चगट प्रदान कार्यालया समोर आहेत. एक प्रचंड वृक्ष बोरवली पार्क समोरच्या ओंकारेश्वराच्या मागे आहे. नागचाफ्याचे हे झाड आपल्याला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये मिळेल तसेच कस्तुरबा हॉस्पिटल, एच पी पार्क, कुलाबा या ठिकाणही कैलासपतीची सुंदर झाडे आपल्याला पाहायला मिळतील.
लागवड
- बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत.
उपयोग
- लाकूड अत्यंत टणक असते, म्हणून त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असे ही नाव आहे.
आढळ
- मूळ स्थान ब्रह्मदेश, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश आहेत.