Jump to content

नांदगाव (तुळजापूर)

  ?नंदगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरतुळजापूर
जिल्हाउस्मानाबाद जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

नंदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.

=लोकजीवन

12 हुतात्मा असलेल्या नंदगाव हे गाव जिल्ह्यातील दक्षिणे कडील टोकाला हे गाव वसलेले आहे. येथील नागरिक खूप प्रेमळ व मनमिळाऊ आहेत. ग्रामदैवत नंदी बसवेश्वर असून अक्षय तृतीयेला मोठी भव्य व दिव्य यात्रा भरते. गावातील लोक हुशार असून कलावंताचा गाव म्हणून नंदगाव प्रसिद्ध आहे. निजाम राजवट विरुद्ध गावाने लढा दिला व स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले त्यामुळे रझाकार गावावर हल्ले व गोळीबार करून 12 लोकांना जागीच गोळ्या झाडून ठार केले व गावाला आग लावली संपूर्ण गाव जळून खाक झाले. गावातील सिद्रामप्पा शरणार्थी , आणाप्पा वाले, बाळाप्पा कुंभार व त्यांचे सहकारी यांनी रझाकारांशी शर्थीने झुंज दिली. गावात विरक्त मठ असून श्री म. नि. प्र राजशेखर महास्वामीजीं हे मठाधिपती आहेत. गावात 60 टक्के लिंगायत समाज असून उर्वरित 40 टक्के समाज आहेत त्यामध्ये 12 बलुतेदार आहेत. गावाचं प्रमुख व्यवसाय शेती असून खरिपात सोयाबीनचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतला जातो. गावामध्ये शिलवंती नावाचे तलाव आहे. गावात 70 टक्के कन्नड भाषा बोलली जाते.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate