नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुण्यानजिक बांधण्यात येणारा विमानतळ आहे.त्यासाठी पुण्याजवळील राजगुरुनगरच्या खेड परिसरात सुमारे १२६८ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येत असून त्यापैकी ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण या विमानतळास विकसित करणार आहे.भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्रातील तीन विमानतळांना मंजूरी दिली आहे.मंत्रीमंडळाच्या निश्चितीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल.[१]
सध्या वापरात असलेला, पुण्याजवळच्या लोहगाव येथील पुणे विमानतळ हा मुलतः संरक्षण विभागाचा आहे.त्यावर नागरी उड्डाणास सध्या परवानगी आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ लोकमत नागपूर दि.१४/११/२०१३ पान क्र. १ व ३, (मथळा-नागपूर विमानतळ मार्गी लागणार) Archived 2013-11-16 at the Wayback Machine. दि.१४/११/२०१३ रोजी ०९.५८ वाजता जसे दिसले तसे.