Jump to content

नवरंग (पक्षी)

नवरंग (पक्षी)
शास्त्रीय नाव
(Pitta brachyura)
कुळ
(Ardeidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश इंडियन पिटा
(Indian Pitta)

नवरंग (मराठी, हिंदी) म्हणजे भारतीय पिटा (इंग्रजी : Indian Pitta), (शास्त्रीय नाव : Pitta brachyura brachyura). या पक्षाची अन्य मराठी नावे बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी आहेत.

  • कन्नड नावे :पित्त, नेल्गुप्प म्हणतात.
  • गुजराती नावे : नवरंग, हरियो
  • तेलुगू नावे : पालान्की पितट, पोन्नगी
  • संस्कृत नावे : पद्मापुष्प, पिकाद्द, भारत पद्मापुष्प
  • हिंदी नावे : चरचरी, नवरंग, नोरंग, रुगेल

आढळस्थान

हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो. तो भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो व त्याच्या विणीच्या काळात म्हणजे, मे ते ऑगस्ट या काळात दिसतो.

नवरंग पक्षाचे वर्णन

पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असू भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.

प्रजनन काळ

नवरंगाच्या विणीचा काळ मे ते ऑगस्ट असून गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.

खाद्य

विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे.

वैशिष्ट्य

झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा व्हीट – ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो.

चित्रदालन

बाह्य दुवे

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/7d/Pitta_brachyura.jpg

संदर्भ