Jump to content

नवनाथ गोरे

नवनाथ गोरे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांना त्यांच्या फेसाटी या कादंबरीसाठी २०१८ सालचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.[] यापूर्वी याच कादंबरीला मनोरमा साहित्य मंडळीकडून, सोलापूरच्या मनोरमा साहित्य परिषदेचा स,रा. मोरे ग्रंथालयाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या आधी नवनाथ गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, लातूर, वर्धा येथील बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्‍कार असे एकूण दहा पुरस्‍कार मिळाले आहेत.[]

नवनाथ गोरे हे मुळचे सांगली जिल्‍ह्यातल्या उमदी (जत तालुका) येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण उमदी येथे झाले असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमए (मराठी) केले आहे.

संदर्भ

  1. ^ लोकसत्ता https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/sahitya-akademi-award-winner-navnath-gore-profile-1702588/. २०२०-०५-२५ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "मतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-06-22. 2018-06-22 रोजी पाहिले.[permanent dead link]