Jump to content

नवग्रह

नवग्रह संस्कृतमध्ये नवग्रह म्हणजे “नऊ आकाशीय संस्था” आणि नऊ खगोलीय संस्था तसेच हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषातील देवता आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु ,केतु आहेत.

नवग्रह ही नऊ स्वर्गीय पिंड आणि देवता आहेत जी हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवरील मानवी जीवनावर प्रभाव टाकतात.[] हा शब्द नऊ (संस्कृत: "नव") आणि ग्रह (संस्कृत: "ग्रह,पकडणे, धारण करणे") या दोन शब्दांपासून बनले आहे. नवग्रहाचे नऊ भाग म्हणजे सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि हे ग्रह आणि चंद्राचे दोन नोड म्हणजे राहू आणि केतू आहेत.[]

हिंदू मंदिरात आढळणारे एक सामान्य नवग्रह मंदिर ग्रह हा शब्द मूळतः केवळ ज्ञात असलेल्या पाच ग्रहांना लागू करण्यात आला (म्हणजे उघड्या डोळ्यांनी दृश्यमान) आणि पृथ्वीला वगळण्यात आले. या शब्दाचे नंतर सामान्यीकरण करण्यात आले, विशेषतः मध्ययुगात, सूर्य आणि चंद्र (कधीकधी "दिवे" म्हणून संबोधले जाते), एकूण सात ग्रह बनवले. हिंदू कॅलेंडरच्या आठवड्याचे सात दिवस हे सात शास्त्रीय ग्रह आणि युरोपियन संस्कृतीच्या संबंधित दिवसांच्या नावांशी सुसंगत आहेत आणि भारतीय उपखंडातील बहुतेक भाषांमध्ये त्यानुसार नावे आहेत. जगभरातील बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये नवग्रहाच्या उपासनेसाठी समर्पित स्थान आहे.

हिंदू धर्मानुसार

भारतीय संस्कृतीतील आणि संपूर्ण मानव जातींच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या रोजच्या हालचालींवर असलेले त्यांचे " कर्म ", आणि ह्या कर्मात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे " नशीब. " भारतीय संस्कृतीत माणसाच्या वागण्या, बोलण्याला आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्यांचे निसर्गाशी आणि मानवाशी काहीतरी संबंध असतो, असे जुन्या परंपरेनुसार मानले जाते. अश्या गोष्टीमध्ये नवग्रहांचा समावेश अाहे. त्यांना म्हणजे ह्या नवग्रहांना हिंदू धर्मानुसार मानवाच्या कर्मात फळ देण्याचा अधिकार आहे. आणि हे फळ जाणण्यासाठी " जोतिष शास्त्र " नावाचे शास्त्र जन्माला आले.

भारतातील ऋषी-मुनींनी आपल्या तथाकथित आत्मज्ञानाने व होम-हवंन ह्यांच्या साहाय्याने मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे असे नऊ ग्रह आकाश मंडळात आहेत, असे मानले.

ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या या नऊ ग्रहापैकी प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्या ग्रहापासून शुभफळ प्राप्त करण्याचे काही उपाय आहेत, असे ज्योतिषी सांगतात. याच उपायांमधील एक उपाय म्हणजे अशुभ ग्रहाच्या मंत्राचा जप करणे.

नवग्रह देवता

सूर्य (अन्य नावे - रवी / आदित्य / दिनकर / सूर्यनारायण / भास्कर इत्यादी) : सूर्याला ज्योतिषशास्त्रात रवी म्हणतात. त्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेव हे कश्यप पुत्र यातील अदितीचे पुत्र आहेत. ते सात घोडयांच्या रथामध्ये बसून आकाश मंडलात भ्रमण करत असतात, अशी कल्पना आहे. सूर्याला एक पृथ्वीवरील सजीवांचे कारक मानले गेले आहेत.

भारतीय संस्कृतींमध्ये सूर्यदेवाला सर्व ३३ कोटी देवांमधील प्रथमदर्शी आणि अस्तित्व प्रदान म्हंटले आहे. त्याचबरोबर सूर्याला हिंदू देवतांतील महत्त्वाचे देव शिव आणि विष्णू यांचे एकरूप मानले गेले आहे. शिवावरून " अष्टमूर्ती " आणि विष्णूवरून " सूर्यनारायण " आहे.

सूर्यदेवाला सत्त्वगुणातील महत्त्वाचे कारक त्याचबरोबर आत्मा, महाराजा आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रतिनिधित्व करण्याचे कारक मानले जाते. भारतीय संस्कृतीत सूर्याला महान त्याचबरोबर जगाला सामर्थ्य देणारा संततीतील जन्मदाता मानले गेले आहे. सूर्यदेव अग्नीचे प्रतिनिधित्व करतात.

सूर्यदेवाचे पुत्र शनिदेव, यमदेव आणि महाभारतातील कर्ण आहेत.

नेतृत्व प्रभावित राशी  - सिंह
वार  - रविवार
रंग  - भगवा, केशरी

चंद्र ( सोम / शशी ) : चंद्र यांना सोम म्हणजेच शिवाचे रूप मानले गेले आहे. चंद्र हे एक तरुण, आकर्षक आणि तजेलदार असण्याव्यतिरिक्त रात्रीचे प्रतिधीत्व करते म्हणून त्यांना " निशादीपती " संबोधले गेले आहे. चंद्रदेव हे इंद्रदेवांच्या सभेतील एक प्रतिष्ठित अस्तित्व आहेत. ते शांत आणि थंड स्वरूपाचे नेतृत्व करतात. चंद्र या नवग्रहातील प्रधानही म्हंटले गेले आहे. हिंदू पौराणिक युगात त्याचबरोबर इतर धर्मात चंद्राला आदराचे स्थान आहे.

नेतृत्व प्रभावित राशी  - कर्क
वार  - सोमवार
रंग  - सफेद, पांढरा

मंगळ ( भौम / अंगारक ) : मंगळ हे पृथ्वीपुत्र मानले गेले आहे, म्हणूनच त्यांना भौम (भूमिपुत्र ) संबोधतात. हे या नवग्रहातील सेनापती आणि अविवाहित आहेत. जे उष्ण, रागिष्ट, ऊर्जावान स्वरूपातील मानले गेले आहे.तसेच कार्यवाहीक, अभिमान, आत्मविश्वास, मन ओळखणारे आणि अहंकार यांचे प्रतिनिधित्व करतात. हे शुभकार्यातील एक महत्त्वाचे कारक मानले गेले आहे .नवग्रहामध्ये यांचे सूर्य , चंद्र , गुरू यानंतर प्रतिष्ठत ग्रहांमध्ये मोडले गेले आहे. मंगळदेवाचे वाहन मेंढा असून ते लाल रंगातील अस्तित्व आहे.शिव पुराणानुसार मंगळ हे शिवाच्या थेंबापासून निर्मित झाले आहे.

नेतृत्व प्रभावित राशी  - मेष आणि वृश्चिक
वार  - मंगळवार
रंग  - लाल

बुध ( चंद्रपुत्र ) : बुधदेव हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. ते बुद्धीचे कारक असून विष्णू स्वरूप आहेत. बुध ग्रह हे सूर्याच्या जवळचा ग्रह असून गुरुत्वाकर्षणामध्ये पृथ्वीच्या चार पटीने लहान आहे. बुधदेवाला चंद्राचा पुत्र म्हणतात. त्याचबरोबर व्यापार क्षेत्रातील रक्षक आहेत. हे रजो गुणाणुयुक्त असून संवाद आणि बोध याचे प्रतिनिधित्व करतात.

नेतृत्व प्रभावित राशी  - मिथुन आणि कन्या
वार  - बुधवार
रंग  - हिरवा, पोपटी, मोरपिशी

बृहस्पती ( गुरू / देवतांचे गुरू ) : बृहस्पती देव हे देवांचे गुरू मानले गेले आहेत. सुसज्जता आणि धर्म ज्ञानी तसेच देवतांचे बोधक स्वरूप आहेत. ते सत्त्व गुणी असून ज्ञान आणि शिक्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. हिंदू शास्त्रानुसार, देवांचे गुरू बृहस्पती आणि राक्षसांचे गुरू शुक्राचार्य हे विरोधी आहेत.बृहस्पती यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे बृहस्पती (गुरु) हे संपूर्ण ग्रह मालिकेतील सर्वात मोठे आणि विशालकाय ग्रह आहेत.

नेतृत्व प्रभावित राशी  - धनु आणि मीन
वार  - बृहस्पतीवार / गुरुवार
रंग  - पिवळा, सोनेरी

शुक्र ( दैत्यांचे गुरू ) : शुक्रदेव म्हणजे शुक्राचार्य हे दानवांचे शिक्षक आणि दैत्यांचे गुरू मानले गेले आहेत. हे सौन्दर्यातील मुख्य कारक असून तारुण्य, आकर्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. ग्रीक मीथकानुसार हे प्रेम आणि सुंदरतेचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हंटले गेले आहे. बृहस्पतीसारखे यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे. शुक्रदेवांचे वडील कवी आणि पत्नीचे नाव शतप्रभा आहे.

नेतृत्व प्रभावित राशी  - वृषभ आणि तूळ
वार  - शुक्रवार
रंग  - चंदेरी

शनी ( सूर्यसुत / यमाग्रज ) : शनी या ग्रहाचे हिंदू शास्त्रात आणि भौगोलिक शास्त्रात फार महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू शास्त्रानुसार शनिदेव हे नवग्रहांचा राजा " सूर्यदेव व छाया " यांचे पुत्र आणि यमदेवाचे बंधू. शनिदेवाला हिंदू धर्मात न्याय देवता मानले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, सूर्यदेवाची पत्नी छाया शनिदेवांच्यावेळी गर्भवती असताना शिवभक्त असल्याकारणाने शिवाची पूजा करण्यात इतकी मग्न झाली होती कि, तिला संध्याकाळ झाली असतानाही खाण्याचे विसर पडत होते. त्यानुसार त्यांचे वर्ण निशा म्हणजे सावळे झाले. प्रसूती झाल्यानंतर शनिदेवांना पाहताच सूर्यदेव क्रोधीत होऊन म्हणाले कि, हा माझा पुत्र नाही. ते शनिदेवांना कळताच त्यांना त्या गोष्टींचा राग आला आणि ते तेव्हापासून ते एकमेकांचे वैरी झाले. त्याचबरोबर त्यांनी मनाशी पण केला कि, मी सूर्यदेवांसारखे स्थान निर्माण करिन आणि शंकरांना प्रसन्न केले आणि नवग्रहांमध्ये स्थान मिळवले. शास्त्रीय दृष्ट्या आकाशात शनी ग्रहाच्या बाजूला लहान लहान उल्का कवच करून फिरत असतात. संपूर्ण नवग्रहात शनिदेवांचा प्रकोप जास्त त्रासदायक असतो. त्यालाच " साडेसाती " असेही म्हणतात.त्याचबरोबर शनिदेवाचे मंगळदेवांवर आणि सूर्यदेवांवर वैर आहे.

नेतृत्व प्रभावित राशी  - मकर आणि कुंभ
वार  - शनिवार
रंग  - काळा, निळा, जांभळा

राहू  : राहू हे छाया ग्रह यामध्ये मोडतात.राहू हे मस्तकाने राक्षस आणि शरीराने सर्पाच्या आकृतीत आहे. हिंदू ग्रंथानुसार, समुद्र मंथन वेळी समुद्रातून १४ रत्न बाहेर आले त्यामध्ये अमृताचेही समावेश होते, त्यात ते अमृत देण्याच्यावेळेला राक्षस आणि देवांमध्ये भांडण चालल्यामुळे श्री विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवांना ते देण्याचे प्रयास करू लागले त्याक्षणी देवांच्या पंगतीत राहू रूप बदलून बसले, आणि अमृत ग्रहण केले, हे सर्व दृष्ट राहूचे प्रताप सूर्यदेव आणि चंद्र यांना कळताच त्यांनी श्री विष्णूकडे याची वाच्यता केली, त्यावेळी श्री विष्णूनी आपल्याकडे सुदर्शन चक्र सोडून राहूचे शीर कापले. त्याबरोबर राहूच्या पोटात अमृत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही, आणि मस्तक हे राहू आणि धड हे केतूच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाले. त्याचमुळे राहुनी सूर्यदेवांना आणि चंद्राला श्राप दिला तो म्हणजे त्यांच्यावरील ग्रहण येणे.(सूर्यग्रहण चंद्रग्रहण)

नेतृत्व प्रभावित राशी  - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार  - नाही
रंग  - नाही

केतू  : केतू हेसुद्धा छायाच्या रूपातील ग्रह असून मस्तक सर्प आणि धड राक्षसरूपी आहे.या दोघांचा मनुष्यावर त्याबरोबर संपूर्ण सृष्टीवर वाईट किंवा चांगला प्रभाव पडतो.राहू आणि केतू हे दोन्ही सावली रूपातील असल्याकारणाने जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांना झाकून म्हणजेच अंधारातील किंवा ग्रहणासारखे भासतात. (सूर्यग्रहण चंद्रग्रहण)

नेतृत्व प्रभावित राशी  - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार  - नाही
रंग  - नाही

हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला फार महत्त्व दिले गेले आहे. या शास्त्रानुसार मनुष्याचे पुनर्जन्म होत असते , कारण त्यांचा आत्मा अमर असून शरीर बदलणे एवढाच फरक असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मानुसार नवीन योनीत जन्म घेऊन आपल्या पूर्व जन्मातील भोग या जन्मी भोगणे हे आहे. एकूण ८४ लक्ष योनीतुन जावे लागते, त्यामध्ये किड्या - मुंग्यांपासून ते मोठं - मोठे जनावरापर्यंत शेवटचे शरीर मनुष्य मिळते. याचबरोबर, त्या त्या मनुष्य शरीरावर या नवग्रहांचा प्रभाव असतो, म्हणूनच प्रत्येकाला जन्मवार, जन्मदिनांक आणि जन्मवेळ यानुसार शुभ किंवा अशुभ फळ मिळत असते, आणि ह्यासाऱ्या गोष्टींचा खेळ पंचांगावर ( ज्योतिषी ) अवलंबून असतो. प्रत्येक मनुष्य जन्माला येताना आपले भाग्य लिहून येत असतो.

जन्म आद्य अक्षरराशीराशी स्वामी ग्रह
च, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ,मेषमंगळ
इ, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे, वो,वृषभशुक्र
का, कि, कु, घ, ड:, छ, के, को, हा,मिथुनबुध
हि, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो,कर्कचंद्र
मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टु, टे,सिंहसूर्य
टो, पा, पी, पु, ष, ण, ठ, पे, पो,कन्याबुध
रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते,तुळशुक्र
तो, ना, नि, नु, ने, नो, या, यि, यु,वृश्चिकमंगळ
ये, यो, भो, भी, भू, धा, फा, ढा, भ,धनुबृहस्पती ( गुरू )
भो, जा, जे, जी, खी, खू, खे, खो, गा, गी,मकरशनी
गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा,कुंभशनी
दो, दु, थ, झ, त्र, दे, धो, चा, ची,मीनबृहस्पती ( गुरू )
चरित्र सूर्य देव चंद्र मंगळ बुध
पत्नी सुवर्णा आणि छाया रोहिणी शक्तिदेवी इला
रंगभगवा / नारंगी / केशरी पांढरा / सफ़ेद लाल हिरवा
संबंधित लिंगनर नर नर तटस्थ
तत्त्व अग्नी जल अग्नी पृथ्वी
देवता अग्नी वरुणगणपतीविष्णू
संबंधित देवतारुद्रगौरी मुरुगन विष्णू
धातूसुवर्ण / पितळ चांदी तांबे पितळ
रत्नमाणिक मोती / मूनस्टोन पोवळं / प्रवाळ पाचू
शारीरिक अंग हाडे रक्त मज्जा त्वचा
स्वादतीव्र गंध मीठ आम्ल संमिश्र
धान्यगहूतांदूळअख्खा मसूर किंवा मसूर डाळ मूग किंवा मूग डाळ
ऋतूउष्ण थंड उष्ण उष्ण कटिबंध
दिशापूर्व वायव्य दक्षिण उत्तर
दिवसरविवार सोमवार मंगळवार बुधवार
चरित्र गुरू (बृहस्पति) शुक्र शनि राहू (उत्तर आसंधि) केतू (दक्षिण आसंधि)[]
पत्नीतारा सुकीरर्ती और ऊर्जस्वती -नीलादेवी[]सिंही चित्रलेखा
रंगसुवर्ण पिवळा काळा / निळा चंदेरी चंदेरी
संबंधीत लिंगनर मादी नर - - तटस्थ[]
तत्त्व वायु जल वायु वायु पृथ्वी
देवताइंद्रइंद्राणी ब्रह्म निर्ऋती गणपती
संबंधित देवताब्रह्म इंद्रयम मृत्यु चित्रगुप्त
धातूसुवर्ण चांदी लोखंड शिसा शिसा
रत्नपुष्कराज हिरा नीलम गोमेद लसण्या
शारीरिक अंग मस्तिष्क वीर्य मांसपेशी - -त्चचा[]
स्वादगोड आंबट तुरट - -
धान्यचणे राजमा तीळ उडीद डाळ कुळीथ[]
ऋतू थंड वसंत संमिश्र - -
दिशाउत्तर - पूर्व दक्षिण - पूर्व पश्चिम दक्षिण - पश्चिम -
दिवसबृहस्पतिवार / गुरुवार शुक्रवार शनिवार - -
ग्रहमंत्र
सूर्य'ॐ ह्रीं ह्रों सूर्याय नम:।'
चंद्र'ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।'
मंगळ'ॐ हूं श्री मंगलाय नम:।'
बुध'ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नम:।'
बृहस्पती'ॐ ह्रीं क्लीं हूं बृहस्पतये नम:।'
शुक्र'ॐ ह्री श्रीं शुक्राय नम:।'
शनि'ॐ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नम:।'
राहु'ॐ ऐं ह्रीं राहवे नम:।'
केतु'ॐ ह्रीं ऐं केतवे नम:।'

राशिचक्र आणि त्यांचे शासक[],रत्ने, नवग्रहांचे अंकशास्त्रातील अंक []

मेष : मंगळ : पोवळे : ९, १८ आणि २७

वृषभ : शुक्र  : हिरा : ६, १५ आणि २४

मिथुन : बुध : पाचू : ५, १४ आणि २३

कर्क  : चंद्र : मोती : २, ११, २० आणि २९

सिंह : सूर्य : माणिक : १, १०, १९ आणि २८

कन्या  : बुध : पाचू  : ५, १४ आणि २३

तूळ : शुक्र : हिरा : ६, १५ आणि २४

वृश्चिक : प्लूटो (परंपरागत मंगळ) : पोवळे : --- (प्लूटो) ९, १८ आणि २७ (मंगळ)

धनु : बृहस्पति : पुष्कराज  : ३, १२, २१ आणि ३०

मकर : शनि : नीलम : ८, १७ आणि २६

कुंभ: युरेनस (परंपरागत शनि) : नीलम : ४, १३, २२ आणि ३१ (युरेनस) ८, १७ आणि २६ (शनि)

मीन : नेपच्यून (परंपरागत गुरू) : पुष्कराज : ७, १६ आणि २५ (नेपच्यून) ३, १२, २१ आणि ३० (गुरू)

--- : राहू (उत्तर आसंधि) : गोमेद : ४, १३, २२ आणि ३१

---  :केतू (दक्षिण आसंधि) : लसण्या किंवा वैडूर्य : ७, १६ आणि २५


संदर्भ यादि

  1. ^ Dalal, Roshen (2010). Hinduism: an alphabetical guide. New Delhi: Penguin Books. ISBN 978-0-14-341421-6. OCLC 664683680.
  2. ^ Monier-Williams, Sir Monier (1819–1899). Oxford Dictionary of National Biography. Oxford University Press. 2017-11-28.
  3. ^ "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (इंग्रजी भाषेत). 2018-03-06. 2024-03-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (इंग्रजी भाषेत). 2018-03-06. 2024-03-10 रोजी पाहिले.
  5. ^ "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (इंग्रजी भाषेत). 2018-03-06. 2024-03-10 रोजी पाहिले.
  6. ^ "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (इंग्रजी भाषेत). 2018-03-06. 2024-03-10 रोजी पाहिले.
  7. ^ "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (इंग्रजी भाषेत). 2018-03-06. 2024-03-10 रोजी पाहिले.
  8. ^ "Ruler". Astrodienst Astrowiki (इंग्रजी भाषेत). 2022-12-31. 2024-03-22 रोजी पाहिले.
  9. ^ Hough, Julianne (2022-07-07). "Planets In Numerology : The 9 Numerology Planets & Their Significance" (इंग्रजी भाषेत). 2024-03-22 रोजी पाहिले.