नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे.[१][२] या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते.
[[चित्र:<नर्मदा परिक्रमेचा मार्गi.<extension>]] असे लिहावे.
नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व
रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.[३]
इतिहास
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.[४] मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली !
स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.[२]
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे.[५] तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हणले आहे.
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची साद्यंत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ’उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा” या पुस्तकात मिळते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या पुस्तकात भौगोलिक माहितीचीही जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते.
या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.
उत्तरवाहिनी परिक्रमेवर ही दोन पुस्तके आहेत :
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक ऋषिकेश ओझा
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक प्रा. क्षितिज पाटुकले
- सायकलवरची माझी नर्मदा परिक्रमा : लेखक कैलासवासी चंद्रकांत रघुनाथ भालेराव
नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम
रिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक, नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते.[६] परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते.
रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
आवश्यक गोष्टी
परिक्रमेत जाताना -
- पांघरण्यास एक रग
- खाली अंथरण्यास एक पोते, चटई अथवा कांबळे
- पाण्यासाठी कडी असलेला डबा
- थंडीसाठी स्वेटर अथवा जॅकेट
- हातात काठी असल्यास सुविधा होते.
पायी परिक्रमा करतांना लागणारी गावे
परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू केली तर खाली दिलेली गावे क्रमाक्रमाने लागतात. [७] संपूर्ण परिक्रमा सुमारे ३००० किलोमीटरची होते. [८]
- ओंकारेश्वर
- मोरटक्का
- टोकसर
- बकावा
- भट्यान
- अमलथा
- बडगाव
- नावा टौडी|शालिवाहन आश्रम
- बलगाव
- खलघाट
- कठोरा|भिकारी बाबा आश्रम
- दवाना
- राजपूर
- दानोद
- पलसुद
- निवाली
- पानसेमल
- ब्राम्हणपुरी
- प्रकाशा
- खापर
- सागबारा
- डेडियापाडा
- खुरा आंबा
- राजपिपला
- गोरागाव|नवीन शूलपाणेश्वर
- कटपूर
- कटपूर ते मिठीतलाई-बोटीतून समुद्राने प्रवास - (नर्मदा व समुद्र याच्या संगमाचे स्थान.)
- एकमुखी दत्त
- अविधा
- सुवा
- नवेठा
- झाडेश्वर
- धर्मशाला
- नारेश्वर
- शिणोर
- चांदोद
- तिलकवाडा
- गरुडेश्वर
- मांडवगड|चतुर्भुज राम
- रेवकुंड
- हिरापूर
- महेश्वर
- जलकुटी
- मंडलेश्वर
- जलूद
- घारेश्वर|अर्धनारीनटेश्वर
- विमलेश्वर
- खेडीघाट
- पामारखेड
- नर्मदेचे नाभिस्थान
- छिपानेर
- बाबरीघाट
- आवरीघाट
- बुदनी
- बनेटा थाला
- पतईघाट
- थारपाथर
- नर्मदेचा उगम
- कबीर चबुतरा
- रुसा
- गाडा सरई
- डिंडोरी
- चाबी
- सहस्रधारा
- तिलवाडा|जबलपूर जवळ
- सोमती
- कोरागाव
- करेली
- कौंडिया
- बासरखेडा
- करणपूर
- हुशंगाबाद
- आमुपुरा
- मालवा
- छितगाव
- हरदा
- मांडला
- ओंकारेश्वर - परत[९]
नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत क्रमाने लागणारी गावे
बहुतेक गावे मध्य प्रदेश राज्यातील आहेत.
- ओंकारेश्वर
- राजघाट
- प्रकाशा
- गोरागॉंव
- भालोद
- अंकलेश्वर
- कठपूर
- मिठीतलई
- भडोच
- मोटी कोरल
- नारेश्वर
- तिलकवाडा
- कोटेश्वर
- गरुडेश्वर
- मांडू
- सहस्रधारा
- महेश्वर
- मंडलेश्वर
- बडवाह
- नेमावर
- बरेली
- बरमनघाट
- जबलपूरचा गौरी घाट
- अमरकंटक
- हुशंगाबाद
- ओंकारेश्वर
नर्मदा पूजनाचे प्रकार
परिक्रमेतील महत्त्वाची धार्मिक स्थाने
पुस्तके
नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके[७]
- अमृतस्य नर्मदा (मूळ हिंदी) लेखक : अमृतलाल वेगड, अनुवाद: मीनल फडणीस
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक ऋषिकेश ओझा
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक प्रा. क्षितिज पाटुकले
- एका वारकऱ्याची नर्मदा परिक्रमा (नमामि देवि नर्मदे) - चंद्रकांत माधवराव पवार
- चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
- तत्त्वमसि - लेखक ध्रुव भट्ट, अनुवाद अंजनी नरवणे - केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी
- तीरे तीरे नर्मदा (हिंदी) - अमृतलाल वेगड
- नमामि देवि नर्मदे ! - चंद्रकांत माधवराव पवार
- नमामि नर्मदे (सतीश चुरी)
- नमामि देवी नर्मदे - रमेश जोशी
- नर्मदा तारक सर्वदा - सुहास डासाळकर
- नर्मदातीरी (स्कूटरवरून नर्मदा परिक्रमा) - वासंती प्रकाश घाडगे - प्रकाशक : उद्वेली बुक्स.
- नर्मदातीरी मी सदा मस्त (सदानंद येरवडेकर)
- नर्मदा तुम कितनी सुंदर हो (हिंदी) -अमृतलाल वेगड
- नर्मदा निरंजनी : हरिभाऊ निठुरकर महाराजांबरोबर केलेली एक दिव्य अनुभव यात्रा (नारायण साठे)
- नर्मदा परिक्रमा - दा.वि. जोगळेकर
- श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - नर्मदाप्रसाद
- नर्मदा परिक्रमा - नीला जोशीराव - मंगेश प्रकाशन.
- नर्मदा परिक्रमा - एक अभ्यासपूर्ण आनंद यात्रा. लेखक : वासुदेव वामन बापट गुरुजी, ढवळे प्रकाशन
- नर्मदा परिक्रमा (भालचंद्र वाळिंबे; esahity.com वरील मोफत ई-पुस्तक)
- नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
- नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी प्रकाशन.
- नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (लेखक-उदयन् आचार्य) प्रकाशक मोरया प्रकाशन पुणे
- नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाऊस,
- नर्मदा परिक्रमा - यू-ट्यूबवरील अनुभवकथन मालिका; निवेदक -सौ. प्रतिभा सुधीर चितळे
- नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती - सुरूची नाईक
- नर्मदा माते नर्मदा (दत्तप्रसाद दाभोळकर)
- नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे
- नर्मदायन (स्नेहा विहंग, डिंपल प्रकाशन, प्रकाशन दिनांक ७-१-२०१७)
- यू ट्यूब वर 'नर्मदेचा अपूर्वानंद' ही अनुभव कथन मालिका (अपूर्वानंद कुलकर्णी)
- नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये (प्रस्तावना : वि.रा. करंदीकर)
- नर्मदेऽऽ हर हर - जगन्नाथ कुंटे - प्राजक्त प्रकाशन.
- नर्मदे हर हर नर्मदे - सुहास लिमये
- परिक्रमा नर्मदेची - नारायण आहिरे
- परिक्रमा ... श्री नर्मदेची : एक आनंद यात्रा - अरविंद केशवराव मुळे (ऋचा प्रकाशन, नागपूर)
- प्रवाह माझा सोबती (व्यंकटेश बोर्गीकर)
- बसने नर्मदा परिक्रमा - वामन गणेश खासगीवाले
- ब्रह्ममायेच्या तीरावरील नर्मदा परिक्रमा - उदय जोशी
- सायकलवरची माझी नर्मदा परिक्रमा - कैलासवासी चंद्रकांत रघुनाथ भालेराव
- भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - अरुण बोरीकर
- माझी नर्मदा परिक्रमा - प्रभा बरसोडे
- माझी नर्मदा परिक्रमा - सदाशिव अनंत सांब
- संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - मोहन वासुदेव केळकर
- साधनामस्त - जगन्नाथ कुंटे
- सौदर्य की नदी नर्मदा (हिंदी) - अमृतलाल वेगड
- पाऊले चालती नर्मदेची वाट*
लेखक विजय लक्ष्मण देशपांडे नाशिक.
- नमामि मातृ नर्मदे ... (श्री.मधुकर संत.)
हेही पाहा
- नर्मदा नदी
- मध्यप्रदेश
- नर्मदा बचाव आंदोलन
- गोदावरी परिक्रमा
संदर्भ
- ^ Neuß, Jürgen (2012-08-03). Narmadāparikramā - Circumambulation of the Narmadā River: On the Tradition of a Unique Hindu Pilgrimage (इंग्रजी भाषेत). BRILL. ISBN 9789004230286.
- ^ a b Bal, Hartosh Singh (2013-10-19). Water Close Over Us: A Journey along the Narmada (इंग्रजी भाषेत). HarperCollins Publishers India. ISBN 9789350297063.
- ^ Asaadhu (2018-05-20). Dharm Kranti: Dharmik Andhvishwas Ke Nirmulan Avam Vishwa Bandhutva Ki Sthapana Hetu (हिंदी भाषेत). Educreation Publishing.
- ^ Jain, Virendra. Vitaan Hindi Pathmala – 8 (हिंदी भाषेत). Vikas Publishing House. ISBN 9789325973398.
- ^ Singh, Manoj (2018). Vaidik Sanatan Hindutva (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352666874.
- ^ Omkareshwar and Maheshwar: Travel Guide (इंग्रजी भाषेत). Goodearth Publications. 2011. ISBN 9789380262246.
- ^ a b "नमामि देवि नर्मदे". 2019-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "तरुण भारत नागपूर - ई-पेपर -आसमंत पुरवणी - दिं. ०८/०९/२०१३". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-08 रोजी पाहिले.
- ^ "तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, आसमंत पुरवणी दि. ०८/०९/२०१३". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-08 रोजी पाहिले.