नर्गीस दत्त
नर्गीस दत्त | |
---|---|
जन्म | फातिमा रशीद जून २, १९२९ |
मृत्यू | ३ मे, १९८१ (वय ५१) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | आवारा, मदर इंडिया |
पती | सुनील दत्त |
अपत्ये | संजय दत्त |
नरगीस दत्त (मूळ नाव: फातिमा रशीद; १ जून, १९२९:कोलकाता - ३ मे, १९८१:मुंबई) या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केले.
हिने बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६० च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता राज कपूर होते.
मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
कौटुंबिक माहिती
दत्त या अनवर हुसेन या चित्रपट अभिनेत्याच्या बहीण होत. नरगीस यांचे राज कपूर यांच्याशी संबंध होते. कपूर यांनी आपल्या पत्नीस घटस्फोट देण्यास नकार दिल्यावर नरगीस यांनी हे संबंध संपवले.[१][२][३] त्यानंतर नरगीस यांनी आपल्या मदर इंडिया चित्रपटातील सहकलाकार सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुनील दत्त यांनी नरगीस यांना आगीतून वाचविले होते.[४] त्यांच्यापासून त्यांना तीन मुले झालील. यांपैकी संजय दत्त हे चित्रपट अभिनेता आहेत. नम्रता यांनी राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव यांच्याशी लग्न केले. प्रिया दत्त यांनी आपले वडील सुनील दत्त यांच्यानंतर राजकारणात प्रवेश केला व त्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.[४]
संदर्भ
- ^ "Clangorous Liaisons – Bhaichand Patel – Nov 19,2007". outlookindia.com. 2 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rishi Kapoor Reveals Dad Raj Kapoor's Alleged Affairs With His Heroines - NDTV Movies". Movies.ndtv.com. 17 January 2017. 30 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Feryna Wazheir to play Nargis in 'Manto'". Times of India. 30 July 2017 रोजी पाहिले.
- ^ a b Dhawan, M. (27 April 2003). "A paean to Mother India". The Tribune. 7 September 2008 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in:
|publisher=
(सहाय्य)