Jump to content

नयना लाल किडवाई

नयना लाल किडवाई
नयना लाल किडवाई आणि ॲडमिरल सुनील लांबा
जन्म १९ एप्रिल, १९५७ (1957-04-19) (वय: ६७)
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा व्यावसायिक
जोडीदार रशीद किडवाई
वडील सुरिंदर लाल खत्री
नातेवाईककरमचंद थापर (आजोबा)
पुरस्कार पद्मश्री

नयना लाल किडवाई (१६ एप्रिल, १९५७, कलकत्ता - हयात) या प्रभावशाली कॉर्पोरेट महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वडील सुरिंदर लाल एका प्रसिद्ध विमा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. किडवाई यांचे आजोबा करमचंद थापर हे थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आहेत.

नयना लाल किडवाई यांचा जन्म १६ एप्रिल १९५७ रोजी झाला. किडवाई यांची बहीण नोनिता लाल कुरेशी या १९८९ च्या अर्जुन पुरस्कार विजेती आहेत.[]

शिक्षण

किडवाई यांचे शालेय शिक्षण सिमला येथील लोरेटो कोन्व्हेंट स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली येथील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झाले. तिथे १९७७ मध्ये अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९७७-१९८० या दरम्यान Institute of Chartered Accountant sचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे लंडनच्या हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेसमधून, Business Administration विषय घेऊन त्या एम बी ए झाल्या. दिल्ली विद्यापीठात शिकत असताना स्टुडंट युनियनच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. विद्यापीठामध्ये नेतृत्वकौशल्यासाठी पारितोषिकही मिळविले.[]

हॉवर्ड येथे शिकत असताना मिशेल पोर्टर यांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.

कारकीर्द

  • १९७७ प्राईज वॉटर कंपनीमध्ये रुजू होणाऱ्या पहिल्या तीन महिलांपैकी या एक होत्या.
  • १९८२ ए.एन.झेड ग्रीन्डलेज बँक (आता स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक) मध्ये रुजू झाल्या. वेस्टर्न रिजनच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्या पाहू लागल्या.
  • १९८९ मध्ये त्या संपूर्ण डिविजनच्या प्रमुख झाल्या.
  • १९९४ साली अमेरिकन कंपनी - मॉर्गन स्टेनलीमध्ये काम करू लागल्या, तेव्हा प्रथमच समाजमाध्यमांनी त्यांची नोंद घेतली. भारतातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या पहिल्या महिला कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ) म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. देशातील सर्वात मोठी मर्चंट बँक बनविण्यामध्ये मोठा वाटा होता.
  • २००२ साली त्या एच.एस.बी.सी. (हॉंगकॉंग ॲन्ड शांघाय बँकिंग कॉरपोरेशन) मध्ये रुजू झाल्या. हॉंगकॉंग बँकेत राहून त्यांनी त्या बँकेला इन्व्हेस्टमेन्ट बँक म्हणून उच्च स्थानावर नेले. त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत झाली. पुढे त्या उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, डेप्युटी सी.ई.ओ या पदांवर कार्यरत होत्या.
  • २००६ साली त्या एच.एस.बी.सी.च्या राष्ट्रीय प्रमुख झाल्या व नंतर त्या एच.एस.बी.सी. (इंडिया) च्या सी.ई.ओ झाल्या. त्याच वर्षी ग्रुप जनरल मॅनेजर झाल्या.[]
  • इ.स.२००६ साली त्यांचे नाव वॉल स्ट्रीट या जगप्रसिद्ध शेअर मार्केटमध्ये घेतले जाऊ लागले. त्यांच्यामुळेच परकीय बँकांपैकी भारतीय उद्योगधंद्यांत गुंतवणूक कराणारी हॉंगकॉंग बेंक ही पहिली बँक ठरली. नयना किडवाई यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत २२ परदेशी शहरांमध्ये या बँकेच्या ४३ शाखा उघडल्या आहेत. श्रीमती नयना लाल किडवाई यांचा वार्षिक पगार अंदाजे दोन कोटी रुपये आहे.
  • नयना लाल किडवाई या फिक्कीच्या (फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) च्या माजी अध्यक्ष होत्या.[]
  • त्यांना सूक्ष्म वित्तपुरवठा (मायक्रो फायनान्स) आणि ग्रामीण महिला आणि पर्यावरणासाठी उपजीविका निर्मिती यामध्ये स्वारस्य आहे.[]

कार्यकर्तृत्व

  • भारतातून विदेशी बँकांच्या विनिमयाचे संचालन करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.[]
  • यांचा क्रमांक जगातील ५० सर्वोच्च व्यावसायिक स्त्रियांमध्ये ३४वा आहे.
  • फॉर्च्यून मासिकाच्या २०००, २००२, २००३, २००६ साली प्रकाशित करण्यात आलेल्या यादीनुसार त्या आशियातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या हुशार व्यावसायिक महिला आहेत.
  • २००२ साली टाईम मॅगेझिनने त्यांचा जगातील १५ महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये समावेश केला.
  • २००४ साली वॉल स्ट्रीट जर्नलनी जगातील ५० सर्वोच्च महिला व्यावसायिकांमध्ये त्यांना चौतिसावे स्थान दिले.
  • बिझिनेस टुडेच्या २५ शक्तिशाली भारतीय उद्योजिकांच्या यादीत त्यांच्या नावाचा तीन वेळा समावेश करण्यात आला होता.
  • नेस्लेच्या विश्वस्त मंडळात दाखल झालेल्या पहिल्या भारतीय महिला []
  • हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेसच्या वैश्विक सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.
  • इंडियन अडवायझरी बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.[]

पुरस्कार व गौरव

२००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ

  1. ^ a b c d e सुमन वाजपेयी, अनुवाद : ज्योती नांदेडकर (२०१८). भारतीय उद्योजिका. औरंगाबाद: साकेत प्रकाशन.
  2. ^ "Naina Lal Kidwai". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-02-04.
  3. ^ a b "Naina Lal Kidwai, President, FICCI - FICCI Blog". web.archive.org. 2012-12-22. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-12-22. 2023-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)