Jump to content

नमैराकपम इबेम्नी देवी

खुमान्थेम निंगोल नमैराकपम इबेम्नी देवी (जुलै, १९२६:मणिपूर, भारत - ) या भारतीय गायिका आहेत. या मणिपुरी संगीताच्या खोंग्जोम प्रबा उपप्रकारात निष्णात आहेत.

इबेम्नी देवींचे वडीलही खोंग्जोम प्रबा गायक होते. इबेम्नी देवींनी वयाच्या सहाव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण घेतले. या मणिपुरी लोकसंगीतात खोल, मृदंग आणि ढोलक वाजविणाऱ्या पहिल्या महिला आहेत.