नथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी)
नथिंग लास्ट्स फॉरएव्हर | |
लेखक | सिडने शेल्डन |
अनुवादक | डॉ. अजित कात्रे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | श्रीराम बुक एजन्सी, पुणे |
प्रथमावृत्ती | डिसेंबर २३, २००७ |
मुखपृष्ठकार | जयंत ताडफळे |
विषय | कादंबरी |
पृष्ठसंख्या | ३४१ |
तीन तरुण महिला डॉक्टर्स -
त्यांच्या आशा, त्यांची स्वप्नं, त्यांच्या अवास्तव वाटणाऱ्या इच्छा...
डॉ. पेईज टेलर
हि इच्छा मरणाची केस आहे असे त्यांनी शपथेवर सांगितलं.
परंतु त्या रुग्णाच्या मृत्युपत्रात पेइजसाठी
दहा लाख डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे
हे कळल्यानंतर सरकारी वकिलांनी
ही खुनाची केस आहे असा दावा केला.
डॉ. कॅट हंटर
कोणत्याही पुरुषाला आपल्याजवळ येऊ द्यायचं नाही
अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती.
परंतु ह्या जीवघेण्या पैजेमध्ये सहभागी झाल्यानंतर
सर्व काही विपरीत घडले.
डॉ. हॉनी टॅफ्ट
वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी
परमेश्वराने दिलेल्या बुद्धीपेक्षा
इतर काही 'कौशल्य' आत्मसात करणं गरजेचं आहे
या गोष्टीची त्यांना फार लवकर जाणीव झाली.
जीवन मरणाच्या सीमा रेषेवर घेण्यात येणारे
मोठ्या हॉस्पिटलमधील महत्त्वपूर्ण निर्णय,
खुनाच्या खटल्यातील ताणतणाव आणि
त्याला मिळालेली अनपेक्षित कलाटणी
ही 'नथिंग लास्ट्स फॉरएव्हर'
या कादंबरीची मुख्य वैशिष्ट्ये!