नजफ
नजफ النجف | |
इराकमधील शहर | |
नजफमधील इमाम अली मशीद | |
नजफ | |
देश | इराक |
प्रांत | नजफ |
समुद्रसपाटीपासुन उंची | २०० फूट (६१ मी) |
लोकसंख्या (२०१४) | |
- शहर | १३,८९,५०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० |
नजफ (अरबी: النجف) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर व शिया इस्लाम पंथातील सर्वात महत्त्वपूर्ण स्थानांपैकी एक आहे. नजफ इराकच्या मध्य भागात बगदादच्या १७० किमी दक्षिणेस वसले आहे. येथील इमाम अली मशीद शिया पंथामधील तिसऱ्या क्रमांकाची पवित्र (मक्का व मदीना खालोखाल) मानली जाते. मुहंमद पैगंबराचा भाऊ व शिया पंथाचा पहिला इमाम अली ह्याचे थडगे येथे आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील नजफ पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत