Jump to content

नक्षत्र

सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी
सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी

आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे.

चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे.

आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.

यादी []

# नाव फलज्योतिष्यान्वये देवता संबंधित तारका मानचित्र स्थिती पद
पद १पद २पद ३पद ४
अश्विनीकेतूβ (बिटा) आणी γ (गामा) मेष तारामंडल०° – १३° २०′ मेषचुचेचोला
भरणीशुक्र35 Arietis, 39 Arietis आणि 41 Arietis13AR20-26AR40लीलूलेलो
कृत्तिकारवीPleiades (star cluster)26AR40-10TA00
रोहिणीचंद्रAldebaran10TA00-23TA20वावीवु
मृगशीर्षमंगळλ, φ Orionis23TA40-06GE40वेवोकी
आर्द्राराहूBetelgeuse06GE40-20GE00कु
पुनर्वसुगुरूCastor आणि Pollux20GE00-03CA20केकोहाही
पुष्यशनीγ, δ आणि θ Cancri03CA20-16CA40हूहेहोडा
आश्लेषाबुधδ, ε, η, ρ, आणि σ Hydrae16CA40-30CA500डीडूडेडो
१०मघाकेतूRegulus00LE00-13LE20मामीमुमे
११ (11)पूर्वाफाल्गुनीशुक्रδ आणि θ Leonis13LE20-26LE40मोटाटीटू
१२ (12)उत्तराफाल्गुनीरवीDenebola26LE40-10VI00टेटोपापी
१३ (13)हस्तचंद्रα, β, γ, δ आणि ε Corvi10VI00-23VI20पू
१४ (14)चित्रामंगळSpica23VI20-06LI40पेपोरारी
१५ (15)स्वातीराहूArcturus06LI40-20LI00रूरेरोता
१६ (16)विशाखागुरू/बृहस्पतिα, β, γ आणि ι Librae20LI00-03SC20तीतूतेतो
१७ (17)अनुराधा (Anurādhā)शनीβ, δ and π Scorpionis03SC20-16SC40नानीनूने
१८ (18)ज्येष्ठा (Jyeshtha)बुधα, σ, and τ Scorpionis16SC40-30SC00नोयायीयू
१९ (19)मूळ (Mūla)केतूε, ζ, η, θ, ι, κ, λ, μ and ν Scorpionis00SG00-13SG20येयोभाभी
२० (20)पूर्वाषाढा (Pūrva Ashādhā)शुक्रδ and ε Sagittarii13SG20-26SG40भूधाफाढा
२१ (21)उत्तराषाढा (Uttara Ashādhā)रवीζ and σ Sagittarii26SG40-10CP00भेभोजाजी
२२ (22)श्रवण (Shravana)चंद्रα, β and γ Aquilae10CP00-23CP20खीखूखेखो
२३ (23)धनिष्ठा (Shravishthā) or Dhanisthāमंगळα to δ Delphinus23CP20-06AQ40गागीगुगे
२४ (24)शतभिषा (Shatabhisha)राहूγ Aquarii06AQ40-20AQ00गोसासीसू
२५ (25)पूर्वाभाद्रपदा (Pūrva Bhādrapadā)गुरू/बृहस्पतिα and β Pegasi20AQ00-03PI20सेसोदादी
२६ (26)उत्तराभाद्रपदा (Uttara Bhādrapadā)शनीγ Pegasi and α Andromedae03PI20-16PI40दूत्र
२७ (27)रेवती (Revatī)बुधζ Piscium16PI40-30PI00देदोचाची

पुण्यामधे "नक्षत्र उद्यान" नावाचे एक उद्यान कोथरूडमध्ये आहे.

२८वे नक्षत्र

तैत्तिरीय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यांमध्ये अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात. अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढाचा शेवटचा एक चरण व श्रावणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते.

त्रिपाद नक्षत्रे

कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.[][]

पंचक नक्षत्रे

धनिष्ठा नक्षत्राचे ३रे आणि ४थे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.[][]

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस जर त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र लागलेले असेल तर या नक्षत्राचे दोष लागू नये म्हणून अग्नीदाह करताना पुत्तलविधी केला जातो. किंवा सुतकाचे दिवस संपल्या नंतर, म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती केली जाते.[]

पुस्तके

संदर्भ

  1. ^ उमेश पाण्डे. "शुभा शुभ जानने की तीस सरल विधियाँ". prayog.pustak.org. ६ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "पंचक (Panchak) - क्या होता है पंचक नक्षत्र, कब लगता है पंचक और प्रभाव". astroswamig.com. ३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "पंचक के शुभ नक्षत्र और शुभ फल, जानिए..." हिंदी वेब दुनिया. ३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.