Jump to content

धूळपाटी/२००४ चे जैवविविधता कायदा संदर्भातील नियम

सीबीडी च्या तत्वांना पूर्णपणे ठुकारून २००४ मध्ये शासनाने खालील तरतुदी असलेले नियम जाहीर केले.

२२(६): स्थानिक लोकांच्या सल्ल्याने “लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक“ बनवणे हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे मुख्य कर्तव्य आहे. ह्या नोंदणीपत्रकात स्थानिक जैविक संसाधनांची उपलब्धता आणि ज्ञान, त्यांचे औषधी व इतर उपयोग व संबधित पारंपारिक ज्ञान याबद्दल परिपूर्ण माहिती असेल.

(७)   (बाह्य व्यक्तींनी जैविक संसाधने अथवा ज्ञान वापरणे, व पेटंटांसाठी अर्ज करणे यांबद्दल) मान्यता देण्याच्या संदर्भात राज्य जैवविविधता मंडळ किंवा प्राधिकराने विचारलेल्या विषयांबाबत सल्ला देणे, स्थानिक वैदू व जैविक संसाधनांचे उपयोग करणारे लोक यांची माहिती संकलित करणे ही जैवविविधता व्यवस्थापन समितीची आणखी कर्तव्ये आहेत.

(८)    राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकार हा लोकांच्या जैवविविधता नोंदणीपत्रकाची चौकट, त्यातील विवक्षित विषय व इलेक्ट्रनिक डेटाबेसची रचना कशी असावी हे सांगेल.

(९)    राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकार व राज्य जैवविविधता मंडळी हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनविण्यासाठी मार्गदर्शन करतील, व तांत्रिक मदत पुरवतील.

(१०)   जैवविविधता व्यवस्थापन समित्या लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनवतील व पडताळून पाह्तील. ह्या समित्या बाहेरच्या कोणा-कोणाला स्थानिक जैवविविधता संसाधनांचा व पारंपारिक ज्ञानाचा वापर करू दिला आहे, त्यासाठी काय संग्रहण शुल्क आकारण्यात आले आहे, आणि त्यातुन मिळालेला लाभांश व त्याचे वाटप कसे झाले आहे याचा तपशील ह्याचीही नोंद ठेवतील.

      या नियमांप्रमाणे बी एम सी ला जैवविविधता आणि अधिवासांच्या व्यवस्थापनात काहीही भूमिका ठेवलेली नाही. बी एम सी आता केवळ स्थानिक वनस्पती व प्राण्यांची यादी बनवण्याचे आणि वैदूंचे व औषधी व इतर उपयोग व संबधित पारंपारिक ज्ञान नोंदवण्याचे काम करतात. अजूनही बी एम सी जैवविविधता नोंदणीपत्रके बनवतील व प्रमाणित करतील. तसेच त्यांना संसाधने व ज्ञान वापरण्याबद्दल संग्रहण शुल्क गोळा करण्याचा अधिकार आहे. या बाबतीत एक महत्वाची समस्या म्हणजे लोकांचे ज्ञान या समित्यांनी नोंदवून जाहीर केले, तर त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही. याची खात्री कशी व्हावी? जैव विविधता नोंदणी पत्रक संबंधित बी एम सी ची मालमत्ता असून त्यातील कोणती माहिती खुलेपणे जाहीर करावी हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. विशेषतः जैवविविधतेच्या औषधी व इतर व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या उपयोगांची माहिती जाहीर न करण्याचा निर्णय या समित्यांनी घेतला पाहिजे. परंतु आजच्या नियमांत याला काहीही वाव ठेवलेला नाही.[]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.