धूळपाटी/हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील कुशल संघटक दादासाहेबांचे चारठाणकर यांचे कार्य
हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील कुशल संघटक दादासाहेबांचे चारठाणकर यांचे कार्य..
कुशल संघटक दादासाहेब चारठाणकर यासारख्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रेरित होते. दादासाहेब चारठाणकर यांचा जन्म सोमवार दि. ६ ऑक्टोबर सन १९०६ इसवी सन मार्गशीर्ष वद्य ४ र्थी (शके १८२६) या दिवशी झाला वंशपरंपरागत चालत आलेले देशपांडेपणा गर्भश्रीमंती चारठाणकर यांच्या घराण्यात परंपरेने चालत होती. दादासाहेबांचे बालपण याचामुळे थाटात गेले. दादासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मदरसे तहतानिया या चारठाणा येथील उर्दू शाळेत झाले. दादासाहेबांच्या वडीलांन चारठाणा गाव सोडून जिंतूर तालुक्याच्या ठिकाणी नोकरीनिमित्त जात होते. सातवीपर्यंत त्याचे शिक्षण झाले. शिक्षणाची इच्छा असून ही वडीलांच्या मृत्यूमुळे घरची जबाबदारी त्याच्या वर पडल्यामुळे शिक्षण सोडावे लागले. मनकर्णिका देशपांडे यांच्याशी विवाह झाला. अत्यंत लहान वयात संसाराची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली तरी त्यानी मोठ्या हिमतीने व नेटाने संसार चालू ठेवला.
व्यक्तिगत जीवनावत अनेक संकटांना पार करून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून घेतले. त्यांनी सर्वाना संघटीत करून संघशक्ती निर्माण करण्याचे अलौकिक कार्य तसेच विचारवंतांनी व्याख्याने, भजन, कीर्तन, ऐतिहासिक नाटके इ. कार्यक्रमाद्वारे त्यांनी बेबंदशाही आव्हान देण्याचे साहस केले.
महाराष्ट्र परिषदेच्या परतूर येथील सन १९३७ मधील अधिवेशनामुळे स्वातंत्र्यलढ्यास खरी सुरुवात झाली. ही चळवळ नंतर मराठवाड्यात व संपूर्ण हैदराबाद संस्थानात पसरली. परभणी येथे दादासाहेब चारठाणकर हे त्या वेळी संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख संघटक म्हणून कार्य करत होते. मुक्तिसंग्रामाची चळवळ दडपून टाकण्याचा निझाम सरकारने आटोकाट प्रयत्न केला. पण चळवळीला सतत प्रखरपणे ठेवण्याचे जुलमी राज्य सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचे महान कार्य चारठाणकर यांनी केले. त्याच्या कुशल संघटन कार्यामुळे परभणी जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यात धार चढली.
नही ज्ञानेन सदृशः पवित्रमाहि विद्यते! यायुक्तीप्रमाणे श्रीसरस्वतीची चारठाणा गावी श्रीविश्र्व या नावाने घरातील सर्व ग्रंथ, मासिके वर्तमानपत्रे याच संग्रह करून वाचनालय सुरू केले. वाचनालयाची सुरुवात कोणाकडून कसलीही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता हे खरे. ज्ञानाच्या या गंगेमधून सर्वानी थोडी तरी स्वतःची तहान भागवून घ्यावी हा विचार त्याच्या मनात प्रबळ होत. इ.स १९२९ मध्ये वाचनालयाचे नामांतर श्री गोकुळेश्र्वर वाचनालयात केले. एवढेच नव्हे तर दादासाहेबांनी पदयात्रा करून अनेक खेड्यात भेटी दिल्या लोकांना वाचनाचा छंद लावणे ही सर्वात प्राथमिक गरज आहे. व्यक्ती समाज सुदृढ होण्यासाठी ज्ञानरूपी ग्रंथगंगा प्रत्येकाला पोहचवली पाहिजे.अशा दृढ संकल्पनेचा दादासाहेबांनी जिद्दीने पाठपुरावा केल्याचे जाणवले. दादासाहेबांचे कर्तृत्वाचे पैलू म्हणजे युवकाची संघटना......
संदर्भ
सौ. आशा जगन्नाथ कोरन्ने (संपा) (२०१२)हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पूर्ण वेळ कार्येकर्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था औरंगाबाद प्रथम आवृत्ती पृ .क्र ११२,११३,११४,११५.