Jump to content

धूळपाटी/प्रमेय - अनुमान - पडताळणी

कोणताही वैज्ञानिक निरीक्षणात्मक, प्रयोगात्मक अथवा सैद्धांतिक काहीही काम करत असेल तरी ते प्रमेय -अनुमान -पडताळणी ह्या विज्ञानाच्या कार्यपद्धतीच्या गाभ्याला धरून असले पाहिजे. कोणीही वैज्ञानिक ज्या घटनेचा अभ्यास करू इच्छितो त्या घटनेशी संबंधित उपलब्ध ज्ञानाच्या आधारे एखादे प्रमेय विकसित करून त्यापासून सुरुवात करतो. मग काही निरीक्षणे करून अथवा प्रयोग करून पडताळून पाहता आली पाहिजेत अशी काही प्राथमिक अनुमाने बांधतो. अशी पडताळणी करता येणे हे अत्यावश्यक आहे. मग निरीक्षणातून किंवा प्रयोगातून पुढे आलेला डेटा अनुमानांना धरून असल्यास ज्या प्रमेयाने सुरुवात केली ते प्रमेय मान्य केले जाते. एरवी मुळाचे प्रमेय बाजूला ठेवून एक पर्यायी प्रमेय सुचवून त्या पर्यायी प्रमेयाच्या आधारे नवी अनुमाने बनवली जातात आणि त्यांची पडताळणी केली जाते असे हे चक्र चालत राहून कुठल्याही घटनेबद्दलचे आकलन सतत सुधारले जाते.[]

संदर्भ

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-06-13 रोजी पाहिले.