धूपपात्र
यास 'धूपदाणी' असेही म्हणतात. ही एक माती वा धातुचे बनविलेले एक पात्र आहे. यास धरावयास कडी असते. याची रचना उलट सुलट ठेविलेल्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा निखारे ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. यात पेटलेले निखारे टाकुन त्यावर राळ, चंदनचुरा, गुग्गुळ इत्यादी टाकतात.हे सर्व पदार्थ ज्वालाग्राही असल्यामुळे जळतात व त्याचा धूर होतो. त्यामुळे, घरातील जंतु मरतात वा बाहेर जातात.राळ व गुग्गुळ हे पदार्थ जंतुघ्न आहेत.[ संदर्भ हवा ]देवपूजेत याचा वापर होतो.