Jump to content

धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कारखाना

धूतपापेश्वर आर्यौषधी कारखाना

वैद्यराज कृष्णशास्त्री पुराणिक यांनी इ.स. १८७२ पूर्वी पनवेल येथे एक आयुर्वेद औषधिनिर्माण संस्था सुरू केली होती. त्यांचा मुलगा वैद्य विष्णूशास्त्री पुराणिक (३० जून, इ.स. १८६४ - १३ जुलै, इ.स. १९१४) यांनी त्या संस्थेचे रूपांतर धूतपापेश्वर आर्यौषधी कारखान्यात केले. विष्णूशास्त्रींनी कारखान्याचे यांत्रिकीकरण केलेले होते. आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी वैद्यांना संघटित करण्याचेही काम केले.

विष्णूशास्त्रींनंतर त्यांचा मुलगा वैद्य गंगाधर ऊर्फ नानासाहेब पुराणिक यांनी कारखान्याचा विस्तार केला. धूतपापेश्वर निर्मित शास्त्रशुद्ध, प्रमाणित, सुरक्षित व गुणकारी औषधे आयुर्वेदीय औषधी निर्माण क्षेत्रात व ग्राहकांत गुणवत्तेचा मानदंड म्हणून ओळखली जातात.

प्रकाशने

धूतपापेश्वर औषधी कारखाना यांची स्वतःची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ती अशी:-

  • आरोग्यमंदिर पत्रिका (१९३८पासून नियमितपणे प्रकाशित)
  • आयुर्वेदीय औषधीकरण (मराठी ग्रंथ)
  • औषधी विवरण पुस्तिका (द्वैमासिक ई-पुस्तिका)
  • द्रव्यशोधन विधी (आगामी)