धुळे
हा लेख धुळे शहरा विषयी आहे. धुळे जिल्हा हे स्वतंत्र वेगळे पान आहे.
धुळे शहर | |
जिल्हा | धुळे जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ०६,७५,९०० (२०२२) |
क्षेत्रफळ | १७८ चौ/ किमी कि.मी² |
दूरध्वनी संकेतांक | ०२५६ |
टपाल संकेतांक | ४२४*** |
वाहन संकेतांक | MH-१८ |
निर्वाचित प्रमुख | प्रतिभा चौधरी[१] (महापौर) |
धुळे शहर हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर महाराष्ट्रातील (खान्देश) एक महत्त्वाचे शहर आहे. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खान्देशी भाषेचे माहेर आहे. २०२२ जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,७५,९०० आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे या शहरातून महत्त्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासाचार्य राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू / कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनजवळ चाळीसगाव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि जुने धुळ्यात धार्मिक इमारत शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद आहे. येथिल मंदिरे पाडून ह्या मस्जिदचे निर्माण शाह जहान ने इ.स. १६३० मध्ये एका स्वारी दरम्यान केले. शहरातील सुभाष नगर हे व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन ठिकाणे- नकाणे तलाव,टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार स्वामीनारायण मंदिर, पांझरा नदी आहे. धुळे शहर भारतातील प्रमुख महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.देवपूर भागात असलेले स्वामीनारायण मंदिर हे सुद्धा भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे.नांदेड येथील गुरुद्वाराच्या नंतर सर्वाधिक प्रसिद्ध आणि भव्य असा गुरुद्वारा धुळे शहरात आहे. अजांनशाह वली रहे. दरगाह हे मुस्लिमांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे.
आकर्षणे आणि इतिहास
धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वस्तूसंग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयात अनेक ऐतिहासिक, दुर्मिक वस्तू पाहावयास मिळतात. तसेच सत्कार्योत्तेजक सभेचे श्री समर्थ वाग्देवता मंदिर आहे. येथे समर्थ रामदास स्वामींचे साहित्य जतन करण्यात आले आहे. हा प्रदेश सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली होता. पूष्यमित्र या संग राजवंशांच्या नियंत्रणाखाली धुळे होते. पुढे या प्रदेशावर सातवाहन राज्यांनी राज्य केले. बाल्कीच्या तहा अंतर्गत खान्देशचा पूर्ण प्रदेश मराठा साम्राज्याचा अधिपत्याखाली आला होता.
इ.स. 1818 मध्ये बॉम्बे राज्य बनिवण्यात आले. त्यात खानदेश जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. कॅप्टन ब्रीज हा इथला कलेक्टर नियुक्त झाला जिल्हैाचचे मुख्यालय बनविण्यासाठी धुळे शहर निर्मिती करण्यात आली, या जिल्हैयात बागलाण, जळगांव, धुळे, शिरपूर, नंदूरबार हा प्रदेश होता. त
भौगोलिक माहिती
धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे.
शहराची लोकसंख्या ७,५२,३४४ आहे, शहराचे महत्व मुंबई- आग्रा, धुळे- सोलापूर , हाजिरा- कोलकाता , धुळे- पुणे हे चार राष्ट्रीय महामार्ग जातातशहरात एक महानगरपालिका,१८ ग्रामपंचायती आहेत. शहरातून मेहेरगाव- वैजापूर, धुळे- दौलताबाद, देशिरवडे- धुळे, आर्वी (दक्षिण धुळे)- भडगाव हे ४ राज्य महामार्ग जातात, शिवाय जुने धुळे- चाळिसगाव, देवपूर-इस्लामपूरा , गोंडुर- अवधान असे १५ सिटी महामार्ग जातात. धुळे शहरहे एक मात्र शहर आहे जेथे ४ राष्ट्रीय महामार्ग व ४ राज्य महामार्ग जातात. धुळे शहराची लोकसंख्या देवपूर भागात १,००,००० व जुने धुळे भागात १,००,०००लोक
राहतात.वलवाडी भागात ३५,००० लोकसंख्या राहते. नगावबरी भागात ५०,००० तर दक्षिण धुळे भागात ८०,०००, ग्रामीण धुळे भागात ५०,००० लोक राहतात, मोहाडी उपनगर भागात २०,००० लोक राहतात. पश्चीम धुळे भागात १,००,००० लोक राहतात. पुर्व धुळे भागात १,००,००० लोक राहतात, सेंट्रल धुळे शहरात १,१५,००० लोक राहतात.
हवामान
हवामान सामान्यत: उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४3. से.ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये तापमान 4 से. पर्यत खाली येते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३० ते ३५ से. इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान १८ ते २३ से. इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से. मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो.
धुळे शहरात बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिकेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. पश्चिमेकडील साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिरपूर, शिंदखेडा व धुळे या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होत जाते. धुळे प्रांताचे एकूण ४ तालुके आहेत. धुळे प्रांतातील ५८५ गावे तर ग्रामपंचायत एकूण ९८० असून धुळे महानगरपालीका आहे .
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "प्रतिभा चौधरी बनल्या धुळ्याच्या चौथ्या महिला महापौर!". सरकारनामा. १५ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.