Jump to content

धावपट्टी

धावपट्टी हा विमानतळावरील विमाने उतरण्यासाठी आणि उडण्यासाठी तयार केलेला एक प्रकारचा भाग आहे.तो रस्त्यासदृष्य असून विमानास, यावरून धावून उड्डाणासाठी आवश्यक ती गती प्राप्त करता येते.तसेच विमान उतरतांना,धावपट्टीवर त्याची चाके टेकल्यावर, धावपट्टीवर दौडवुन त्याची गती हळूहळू कमी करून ते थांबविता येते.

विमानाची धावपट्टी

धावपट्टी ही विमान चालण्यासाठीचा एक प्रकारे रस्ताच असल्यामुळे, तो खडीवर मुरुम टाकुन सपाट करून तयार केलेला,डांबरी वा सिमेंट कॉंक्रिटचा असु शकतो.मोठ्या विमानतळावर,रात्रीही विमानोड्डाण/उतरणे सोपे व्हावे म्हणुन धावपट्टीच्या दोन्ही बाजूस विशिष्ट अंतरावर दिवे लावलेले असतात.त्याद्वारे वैमानिकाला आकाशातुन धावपट्टी ओळखणे सोपे होते.