धारखेड
?धारखेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ७.६१ चौ. किमी |
जवळचे शहर | गंगाखेड |
जिल्हा | परभणी जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,७४२ (२०११) • २२९/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | आशा मुंजाजी चोरघडे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/२२ |
धारखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
सर्वसामान्य मराठवाड्यातील इतर खेड्या प्रमाणे लोकजीवन आहे. गंगाखेड शहर जवळ असल्या मुळे शहरातील दुकानात मुनीम आणि हमाली करणारे खूप आहेत.शहर जवळ असले तरी शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.शहर जवळ असल्या फायदे कमी आणि तोटा जास्त सहन केलेले हे गाव आहे.
नागरी सुविधा
धारखेड गंगाखेड पुल तयार होत आहे. शेतात जाणा-या घोडवत रस्त्याचे मातीकाम सुरू आहे. शिकलेली पिढी ग्रामपंचायत धारखेड येथे कार्यरत असल्याने शाळा खोल्या, अंत्यविधी ठिकाण, पाणी पुरवठा योजना या वर काम सुरू आहे.
जवळपासची गावे
मुळी, नागठाणा,अंगलगाव,धसाडी, सुनेगाव,सायळा,रूमणा,जवळा