धातुशास्त्र
धातू मूलद्रव्ये, त्यांची आंतरधात्वीय संयुगे, मिश्रधातू म्हणून ओळखली जाणारी धातूंची मिश्रणे या सर्वांच्या भौतिक व रासायनिक वर्तनाचा अभ्यास करणारी धातुशास्त्र किंवा धातुविज्ञान ही पदार्थविज्ञानातील एक शाखा आहे. धातूंच्या तंत्रज्ञानास, अर्थात धातू व्यावहारिक उपयोगात कसे आणले जातात या विद्येसही, धातुशास्त्र म्हणतात.