Jump to content

धवल क्रांती

अमूल त्रिमूर्ती: वर्गीस कुरियन, श्री त्रिभुवनदास किशिभ पटेल आणि हरिचंद मेघा दलाया

धवलक्रांती किंवा ऑपरेशन फ्लड हा १३ जानेवारी १९७० रोजी सुरू करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा डेअरी विकास कार्यक्रम होता. हा भारताच्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचा (NDDB) एक महत्त्वाचा प्रकल्प होता. [] या क्रांतीने भारताला दुधाची कमतरता असलेल्या राष्ट्रातून [] १९९८ मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला मागे टाकून, २०१८ मध्ये सुमारे २२.२९ टक्के इतक्या जागतिक दूधाचा उत्पादक देश बनवले. [] ३० वर्षांच्या आत भारतातील प्रति व्यक्ती उपलब्ध दूध दुप्पट झाले [] आणि दुग्धव्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा स्वयं-शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण करणारा व्यवसाय बनला. [] शेतकऱ्यांना त्यांच्या विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेल्या संसाधनांवर नियंत्रण देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला. या क्रांतीने केवळ मोठ्या प्रमाणावर उत्पादनच नाही, तर जनसामान्यांच्या उत्पादनात वाढ झाली; म्हणून या प्रक्रियेला "श्वेत क्रांती" असे संबोधले जाते.

अमूल

अमूलचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. वर्गीस कुरियन यांची पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी NDDB चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. कुरियन यांनी कार्यक्रमाला यश मिळवून दिले आणि तेव्हापासून ते धवलक्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. [] जर भारताच्या संघटित दुग्ध उद्योगात क्रांती घडवून आणणारी तांत्रिक प्रगती असेल तर ती म्हणजे म्हशीच्या दुधापासून स्किम मिल्क पावडर बनवणे. ज्या माणसाने हे शक्य केले ते हरिचंद मेघा दलाया होत. []अमूल या डेअरी सहकारी संस्थेचा आनंद पॅटर्न प्रयोग हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागील इंजिन होते. []

संदर्भ

  1. ^ Katar Singh (8 June 1999). Rural Development: Principles, Policies and Management. ISBN 81-7036-773-5. 24 April 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "India largest milk producing nation in 2010–11: NDDB". Hindustan Times. 20 December 2011. 6 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Milk Production by country".
  4. ^ Kurien, Verghese (2007). "India's Milk Revolution: Investing in Rural Producer Organizations". In Narayan, Deepa; Glinskaya, Elena (eds.). Ending Poverty in South Asia: Ideas that work. Washington D.C., USA: (The World Bank). p. 52. ISBN 978-0-8213-6876-3. 11 September 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Pendleton, Andrew; Narayanan, Pradeep. "The white revolution : milk in India" (PDF). Taking liberties: poor people, free trade and trade justice. Christian Aid. p. 35. 11 September 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "Father of white revolution Verghese Kurien dies". The Times of India. 2 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ Kurien, Verghese (2007). "India' s Milk Revolution: Investing in Rural Producer Organizations". In Narayan, Deepa; Glinskaya, Elena (eds.). Ending Poverty in South Asia: Ideas that work. Washington D.C., USA: (The World Bank). p. 47. ISBN 978-0-8213-6876-3. 13 January 2021 रोजी पाहिले. If there was one technological breakthrough that revolutionized India's organized dairy industry, it was the making of skim milk powder out of buffalo milk. The man who made this possible, and who had the foresight to defy the prevailing technical wisdom, was H. M. Dalaya. While the Kaira District Cooperative Milk Producers' Union is usually associated with its founder, Tribhuvandas Patel, it was Dalaya who provided the real technical backbone to the Amul organization.
  8. ^ Kurien, Verghese (2007). "India' s Milk Revolution: Investing in Rural Producer Organizations". In Narayan, Deepa; Glinskaya, Elena (eds.). Ending Poverty in South Asia: Ideas that work. Washington D.C., USA: (The World Bank). p. 42. ISBN 978-0-8213-6876-3. 13 September 2012 रोजी पाहिले.