Jump to content

धर्मेश तिवारी

धर्मेश तिवारी
जन्म २७ एप्रिल १९५१ (1951-04-27)
मृत्यू ६ ऑगस्ट, २०१४ (वय ६३)
चंदिगड, भारत
मृत्यूचे कारण मधुमेह
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारत
पेशा अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक
कार्यकाळ १९८४-२००८


धर्मेश तिवारी (२७ एप्रिल १९५१-६ ऑगस्ट २०१४) हे भारतीय अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक होते.[] ते दूरचित्रवाणी मालिका महाभारतमध्ये कृपाचार्य आणि चाणक्यमध्ये मलयराजच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिका कानूनमध्ये न्यायाधिशाची भूमिका साकारली.

त्यांनी २०१३ मध्ये महाभारत और बर्बरीक या मालिकेसाठी दिग्दर्शन व पटकथा लेखन केले.[] हा त्यांचा शेवटचा प्रकल्प होता.

२००१ मध्ये, ते चित्रपट व दूरचित्रवाणी कलाकार संघटनेचे मानद महासचिव होते.

२००३ मध्ये, ते पश्चिम भारत चित्रपट कर्मचारी संस्था, या चित्रपट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते.[]

२०१३ मध्ये धर्मेश यांनी प्रधानमंत्री या राजकीय कार्यक्रमाच्या एबीपी न्यूझ वाहिनीच्या २६ भागाच्या मालिकेत जसवंत सिंहची भूमिकासुद्धा साकारली.

१० ऑगस्ट २०१४ला ‌वयाच्या ६३ व्या वर्षी तिवारी यांचा मधुमेहाने मृत्यू झाला.[]

संदर्भ

  1. ^ "सिंटा-धर्मेश तिवारी". सिंटा.नेट. 29 सप्टेंबर 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "महाभारत और बर्बरीक". २०२०-०१-१९ रोजी पाहिले.
  3. ^ ललवाणी, विकी (२०१०-११-१२). "भुतपुर्व हे भुतपुर्व झाले". टाईम्स ऑफ इंडिया. 2012-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-14 रोजी पाहिले. ...धर्मेश तिवारी, पभाचिकसंचे अध्यक्ष व सिंटाचे मानद सचिव...
  4. ^ "अभिनेता धर्मेश तिवारीचे चंदिगडमध्ये ६३ व्या ‌वर्षी निधन". हिंदुस्थान टाईम्स. 8 जुलै 2014. 7 ऑगस्ट 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 ऑगस्ट 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे