Jump to content

धर्मपाल कांबळे

धर्मपाल कांबळे (जन्म : पुणे, २९ जून १९६३; - पुणे, - ९ डिसेंबर, २०१७) हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण वाड्मयाचे संपादन करून त्याचे तीन खंड प्रसिद्ध केले होते. पहिला खंड हा पोवाडे, लावण्या आणि गाणी या विषयीचा, दुसरा खंड हा लोकनाट्याविषयीचा तर तिसरा खंड हा अण्णा भाऊ साठेंच्या कथांविषयींचा आहे. हे तिन्ही खंड २०१० साली प्रकाशित झाले आहेत. धर्मपाल कांबळे यांनीच अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ घराचा शोध लावला.

कांबळे हे पुण्यातील मार्केट यार्ड येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनची नोकरी करीत होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती..

पुस्तके

  • अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र (संपादित)
  • अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय (३ खंड)
  • अण्णा भाऊ साठे - आंबेडकर चळवळीचे वारसदार (लेख)
  • प्रबोधनकार केशवसीताराम ठाकरे : व्यक्तित्व, कार्य, साहित्य
  • संक्षिप्त रूपांतर-भारतीय राज्यघटना
  • मृत्यूकडून जीवनाकडे
  • भारतरत्न राजीव गांधी
  • शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा
  • राज्यपाल सुशीलकुमार शिंदे

व्याख्याने

  • पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनात अण्णाभाऊंच्या विविध पैलूंविषयी २००५ ते २००८ अशी सलग ३ वर्षे व्याख्याने.
  • पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी व्याख्याने.

पुरस्कार आणि सन्मान

  • चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा पुरस्कार
  • नाट्य चित्र कला अकादमीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिक पुरस्कार
  • पुणे पोस्ट्स टेलिकॉम सोसायटीच्या वतीने 'गुणवंत कामगार पुरस्कार'
  • पुण्यातील दैनिक प्रभातमध्ये कांबळे यांच्यावर पोस्टमन बनला साहित्याचाही दूत आणि सण्डे पुणे मिरर या वृत्तपत्रात पोस्टमन्स ट्रिपल ट्रिब्युट टु रायटर असे प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले आहेत.