धम्मचक्र मुद्रा
धम्मचक्र मुद्रा याला “धम्मचक्र ज्ञान” चिन्ह म्हणून ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते असा संकेत रूढ आहे.