धमेक स्तूप
धमेक स्तूप | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | स्तूप |
ठिकाण | सारनाथ, उत्तर प्रदेश, भारत |
बांधकाम सुरुवात | इ.स.पू. २४९ |
पूर्ण | इ.स. ५०० |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | ३०० फुट |
धमेक स्तूप (धमेख स्तूप) हा एक प्रचंड आणि भक्कम स्तूप आहे. तो भारतातील उत्तर प्रदेश राज्यातल्या वाराणसी शहरापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारनाथ या गावात आहे.[१]
इतिहास
इ.स.पू. २४९ मध्ये महान मौर्य सम्राट अशोक यांनी या स्तूपाचे आणि काही इतर स्मारकांचे बांधकाम इथे केले आहे. ते तीर्थयात्रा करत इथे आले होते, याची आठवण म्हणून हे काम केले गेले होते. या धमेक स्तूपाचे पहिले बांधकाम होते, तिथे इ.स. ५०० मध्ये नव्याने बांधकाम केले गेले. अगदी सुरुवातीला हे स्तूप, ‘बाजूने गोलाकारात मोठेमोठे दगड लावलेला मातीचा गोलाकार ढीग’ म्हणावेत अशा स्वरूपाचे होते.
बुद्ध आणि त्यांचे काही शिष्यांच्या अस्थींचे आणि इतर काही अवशेषांचे जतन करण्यासाठी सम्राज अशोकांनी हे स्तूप बांधले होते. या ठिकाणीच्या जवळच, ज्यावर आज्ञापत्र केरले गेले आहे, असा अशोकस्तंभ उभा आहे. हरिणांसाठी राखीव असणाऱ्या एका वनामध्ये (ऋषिपट्टण), तिथे बुद्धांनी स्वतःला संबोधी म्हणजेच पूर्णज्ञान पिराप्त झाल्यावर आपल्या पाच शिष्यांना पहिले प्रवचन दिले होते आणि निर्वाणाकडे जाणारा आठ पदरी मार्ग अष्टांगिक मार्ग विशद करून सांगितला होता, त्या जागेची खूण म्हणून ‘धमेक स्तूप’ अभारला गेला आहे. सहा वेळा या स्तूपाचा आकार वाढवला गेला; पण त्याचा वरचा भाग मात्र अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. इ.स. ६४० साली सुआनझॅंग याने सारनाथला भेट दिली होती. तेव्हा त्याने अशी नोंद करून ठेवली होती की, या ठिकाणी १,५०० पेक्षाही जास्त धर्मोपदेशकांची वसाहत होती. आणि मुख्य स्तूपाची उंची जवळजवळ ३०० फूट म्हणजे ९१ मीटर एवढी होती.
वर्तमान स्थिती
सध्या अस्तित्वात असलेला धमेक स्तूप हा विटा व दगड वापरून बांधलेला आहे. त्यांची उंची ४३.६ मीटर एवढी आहे आणि व्यास २८ मीटर इतका आहे. सारनाथमधील ही सर्वात भक्कम आणि मोठी वास्तू आहे. सम्राट अशोकांनी केलेल्या मूळ बांधकामातील तळघर मात्र अजूनही व्यवस्थित टिकून आहे. त्याचा दगडी पृष्ठभाग पटाशीने तासलेला आहे आणि त्यावर गुप्त काळातल्या प्रचलित शैलीत कोरलेली नाजूक फुलांची नक्षी आहे. पूर्ण भिंतीवर माणसांच्या आणि पक्ष्यांच्या अतिशय अप्रतिम अशा आकृत्या कोरलेल्या आहेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये काही मजकूरही केरलेल्या आहे.
चित्रदालन
- धमेक स्तूप, सारनाथ
- दगडावर धमेक स्तूपाचा इतिहास
- Dhamekh Stupa close-up, Sarnath
- Dhamekh Stupa wall Close Up