द लंचबॉक्स
द लंचबॉक्स | |
---|---|
दिग्दर्शन | रितेश बत्रा |
निर्मिती | अरूण रंगाचारी अनुराग कश्यप |
प्रमुख कलाकार | इरफान खान निम्रत कौर नवाजुद्दीन सिद्दिकी |
संगीत | मॅक्स रिश्टर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २० सप्टेंबर २०१३ |
वितरक | मोशन पिक्चर्स |
अवधी | १०५ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹२२ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹१०० कोटी |
द लंचबॉक्स हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. हिंदी व इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या प्रणयपटात इरफान खान व निम्रत कौर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगभर वितरण झालेल्या लंचबॉक्सला अनेक पुरस्कार मिळाले तसेच तिकिट खिडकीवर देखील तो यशस्वी ठरला.
ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये द लंचबॉक्सला विदेशी चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. ऑस्कर पुरस्कारादेखील भारतातर्फे ह्याच चित्रपटाची नोंद पाठवली जाईल अशी चाहत्यांना आशा होती पर्ंतु भारतीय चित्रपट महामंडळाने दुसऱ्याच चित्रपटाची निवड केली.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट (समीक्षक)
- सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण - रितेश बत्रा
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - नवाजुद्दीन सिद्दिकी
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील द लंचबॉक्स चे पान (इंग्लिश मजकूर)