Jump to content

द फँटम टोलबूथ

'द फॅंटम टोलबूथ'
चित्र:Phantomtollbooth.PNG
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील मिलो आणि टॉक (पहिल्या आवृत्ती सारखे चित्रण)
लेखकनॉर्टन जस्टर
देशअमेरिका
साहित्य प्रकारकल्पनारम्य
प्रकाशन संस्थाएपस्टाईन आणि कॅरोल, रॅंडम हाऊसद्वारे वितरित []
प्रथमावृत्ती१२ ऑगस्ट १९६१ [][]
पुस्तकातील चित्रांचे चित्रकारजुल्स फीफर
माध्यममुद्रण (हार्डकव्हर)
पृष्ठसंख्या२५५
आय.एस.बी.एन.978-0-394-82037-8

द फॅन्टम टोलबुथ ही लहान मुलांसाठी लिहिलेली कल्पनारम्य साहसी कादंबरी आहे. याचे लेखल जी नॉर्टन जस्टर आहेत. याचे चित्र स्पष्टीकरण ज्युलस फेफर यांनी दिले आहे. इ.स. १९६१ मध्ये रॅंडम हाऊस (यूएसए) ने हे प्रथम प्रकाशित केले. ही एका मिलो नावाच्या कंटाळलेल्या तरुण मुलाची कहाणी आहे. एका दुपारी अनपेक्षितपणे त्याला जादूचा टोलबूथ मिळतो. काहीही चांगले करायला नसल्यामुळे, तो त्याच्या खेळण्यातला गाडीवर बसतो आणि टोलबूथ म्हणजेच टोलनाक्यात गाडी घालतो. यामुळे तो त्याला विस्डमच्या राज्यात जातो. हे राज्य एकेकाळी फार संपन्न होते पण सध्या फार अडचणीत असते. तेथे त्याला दोन विश्वासू साथीदार मिळताता. तो तेथील बंदिवान राजकन्येला सोडवण्याच्या कामगिरीवर निघतो. त्याच्या साथीदारांचे नाव राईम आणि रीजन असते. राजकन्या हवेत असणाऱ्या किल्ल्यात कैद असते. या प्रक्रियेत, तो मौल्यवान धडे शिकतो, तसेच तो शिकण्याच्या प्रेमात पडतो. या पुस्तकाचा मजकूर हा भरपूर शब्दकोट्या आणि शब्दांच्या खेळांनी भरलेला आहे. उदा. मिलो अजाणतेपणाने विस्डममधील एक बेट कन्क्लुझन्सवर कूच करते तेव्हा अशा प्रकारच्या म्हणींचा शाब्दिक अर्थ शोधतो.

इ.स. 1958 मध्ये, जस्टर यांना त्यांनी लिहिलेल्या मुलांच्या शहरांबद्दलच्या पुस्तकासाठी फोर्ड फाऊंडेशनचे अनुदान मिळाले होते. परंतु त्यांना त्या प्रकल्पावर काही कारणास्तव पुढे काम करता आले नाही. पण त्यातूनच त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक 'फॅन्टम टोलबुथ' बनवले. त्यांचा घर सोबती, फीफर, हा एक व्यंगचित्रकार होता. त्याने या प्रकल्पात स्वतः रस दाखवला आणि कामही केले. रॅन्डम हाऊसचे संपादक जेसन एपस्टाईन यांनी पुस्तक विकत घेऊन प्रकाशित केले. पुस्तकाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. पुस्तकाच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक म्हणजेच तीस लाख प्रती विकल्या आहेत. या पुस्तकावरून चित्रपट, ऑपेरा आणि नाटक बनवले आहे. हे पुस्तक बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरित केले गेले.

वरवर पाहता हे पुस्तक एक साहस कथा आहे, परंतु यात मुखत्वे शिक्षणावरील प्रेमाची गरज दाखवली आहे. यात मिलो शाळेत शिकलेल्या गोष्टी बापरून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रगती करतो आणि पूर्वी ज्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो त्याच जीवनावर प्रेम करण्यास शिकतो. समीक्षकांनी या पुस्तकाची तुलना लुईस कॅरोल लिखित ॲलिस ॲडवेंचर इन वंडरलॅंड आणि एल. फ्रॅंक बाऊमच्या द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ सारख्या पुस्तकांची केली आहे.

कथानक

चित्र:Lands.beyond.jpg
पुस्तकाचे स्पष्टीकरण देण्यासाठी जूलस फीफरने काढलेला नकाशा

यातील मुख्य पात्र मिलो आहे. तो त्याच्या आजूबाजूच्या जगाला कंटाळलेला असतो. प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी वेळेचा अपव्यय असतो. एके दिवशी तो शाळेतून घरी येतो आणि पाहतो की एक रहस्यमय पॅकेज घरी पडलेले आहे. त्यात त्याला एक छोटा टोलबूथ आणि "द लॅंड्स बियॉन्ड"चा नकाशा मिळतो. विस्डम किंगडमचे वर्णन (हे पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर वाचता येईल) देखील मिळते. पॅकेजला जोडलेली एक चिठ्ठी असते ज्यात संदेश असतो की "मिलोसाठी, ज्याकडे भरपूर वेळ आहे.". त्याच्या गंतव्यस्थानाचे स्मरण ठेवण्यासाठी इशारा दिलेला असतो. परंतु मिलोला वाटते की हा एक खोटा खोटा खेळ आहे. तो मज्जा म्हणून डिक्टोपोलिसकडे जाण्याचा विचार करतो. तो त्याच्या इलेक्ट्रिक टॉय कारमध्ये बसून टोलबूटमधून जातो. लगेचच त्याला जाणवते की तो एका रस्त्यावरून गाडी चालवत आहे. तो रस्ता त्याच्या शहरातील नसलेल्याचेही त्याला जाणवते.

मिलोची जिथे अवतरतो त्या जागेचे नाव एक्सपेक्टेशन (मराठी अर्थ अपेक्षा) असते. येथून विस्डमचा रस्ता सुरू होतो. तेथे त्याला व्हेदर मॅन (गोंधळलेल्ल माणूस) भेटतो. मिलो त्याला रस्ता विचारतो. मिलो गाडी चालवत असतानाच स्वप्न पहायला लागतो आणि डोल्ड्रम्समध्ये हरवतो. डोल्ड्रम्स म्हणजे एक रंगहीन जागा जिथे कधीही काहीही घडत नसते. मिलो तिथे राहणाऱ्या लोकांना भेटतो. ते लोक म्हणजे लेथरगियन्स असतात. ते लोक तेथे फक्त वेळ घालवण्यात मग्न असतात. त्यांच्या या कामात टॉकच्या आगमनामुळे व्यत्यय आलेला असतो. टॉक भला मोठ्ठा कुत्रा असतो. त्याच्या प्रत्येक बाजूला घड्याळ (एक "वॉचडॉग") असते. तो मिलोला सांगतो की फक्त विचार करूनच तो डॉल्ड्रम्समधून बाहेर पडू शकतो. त्याचा सल्ला ऐकून मिलो विचार करतो आणि डॉल्ड्रम्समधून बाहेर पडतो. टॉक देखील मिलोच्या विस्डमकडे जाण्याच्या प्रवासात सामील होतो.

संदर्भ

  1. ^ "The phantom tollbooth"] (1st edition)". Library of Congress online catalog. Library of Congress. June 16, 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "The Phantom Tollbooth". Amazon. 27 July 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "The Phantom Tollbooth by Norton Juster | PenguinRandomHouse.com: Books". Penguin Random House. 27 July 2019 रोजी पाहिले.

बाह्यदुवे