द गुड, द बॅड अँड द अग्ली
द गुड, द बॅड ऍन्ड द अग्ली | |
---|---|
दिग्दर्शन | सर्जिओ लिओने |
कथा | सर्जिओ लिओने |
पटकथा | सर्जिओ लिओने |
प्रमुख कलाकार |
|
संकलन | टोनिओ डेली कोली |
संगीत | इन्निओ मॉरिकोने |
भाषा | इटालियन , इंग्लिश |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
द गुड, द बॅड, द अग्ली हा इटालियन चित्रपट आहे, आजवरच्या सर्वाधिक प्रसिद्ध चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. या चित्रपटातील प्रमुख भूमिका क्लिंट इस्टवूड यांनी केली आहे. अमेरिकन गृहयुद्धाच्या काळातील एक कथा रंगवली आहे व अमेरिकन काउबॉय संस्कृतीवर आधारित आहे. तीन भुरटे चोर त्या पैकी एक चांगला असतो ( द गुड) एक जण अतिशय वाईट असतो ( द बॅड) व एक अतिशय गलिछ रहणारा असतो ( द अग्ली) यांवर ही कथा आधारित आहे. एकमेकांच्या चोरीच्या आड येण्यामुळे हे चोर एकमेकांचे शत्रू बनतात. परंतु एका घटनेत गुडला एका कब्रस्तानात लपवलेल्या खजिन्याबद्दल माहिती कळते व तो बॅड त्याच्या कडून खजिन्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी चांगलाच आटापीटा करतो. अग्ली देखील हा खजिना मिळवण्यात सक्रिय होतो व यामध्ये अनेक रोमांचक घटना घडतात.
हा चित्रपट अमेरिकन काउबॉय संस्कृतीवर आहे व मूळचा इटालियन चित्रपट आहे. सर्जिओ लिओने यांनी असे अनेक चित्रपट बनवले व आपार लोकप्रियता मिळवला. त्यांच्या या अमेरिकेवर आधारित इटालियन चित्रपटानां वेस्टर्न स्पेगेटी (स्पेगेटी हा एक इटालियन खाद्यपदार्थ आहे) असे म्हणले जाउ लागले